Tarun Bharat

कोसंबी विचारमहोत्सव 10 पासून

यंदा मडगावात रवींद्र भवनमध्ये आयोजन

प्रतिनिधी /पणजी

यंदाचा ’फेस्टिव्हल ऑफ आयडियाज’ अर्थात डी. डी. कोसंबी विचार महोत्सव दि. 10 ते 14 नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. पाच दिवस चालणाऱया या व्याख्यानमालेद्वारे देशविदेशातील प्रतिभावंतांचे विचार ऐकण्याची संधी गोमंतकीयांना प्राप्त होणार आहे.

महोत्सवाचे यंदाचे 14 वे वर्ष असून दरवर्षी पणजीत कला अकादमीत होणारा हा महोत्सव यंदा मडगाव येथील रवींद्र भवनमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.  त्यातील पहिले विचारपुष्प गोमंतकीय सुपूत्र तथा प्रसिद्ध कोकणी साहित्यिक ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावजे हे गुंफणार आहेत. दि. 11 रोजी दिल्ली एनसीआर येथे अशोका विद्यापीठ स्थापनेसाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱया प्रसिद्ध इतिहासतज्ञ प्रो. माधवी मेनन यांचे व्याख्यान होणार आहे. दि. 12 रोजी सुमारे 50 पुस्तकांचे लेखक असलेले पौराणिक व धार्मिक साहित्यिक देवदत्त पटनाईक यांचे व्याख्यान होईल. दि. 13 रोजी अमेरिकेतील केंब्रिज येथील हॉर्वर्ड विद्यापीठाचे डॉ. सुरज येंगडे यांचे व्याख्यान होईल. दि. 14 रोजी दिल्लीतील जीवरसायनशास्त्रज्ञ आणि लेखक प्रो. प्रणय लाल यांच्या व्याख्यानाने महोत्सवाचा समारोप होईल.

वर्ष 2008 मध्ये या व्याख्यानमालेची सुरुवात करण्यात आली. त्यात आतापर्यंत देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दूल कलाम यांच्यापासून ते जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, इन्फोसिस टेक्नॉलॉजीचे उद्योगपती नंदन निलेकणी तसेच नारायण मूर्ती, भारत आणि अमेरिकेतील इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्ष तथा विश्वस्त सुधा मूर्ती, मेगसेसे पुरस्कार विजेते पत्रकार पी. साईनाथ, जगप्रसिद्ध वास्तुतज्ञ जैमी लेर्नर, जगप्रसिद्ध आध्यात्मिक गुरू दलाई लामा, भारतीय वंशाचे ब्रिटीश अर्थतज्ञ लॉर्ड मेघनाद देसाई, ब्रिटनमधील हाऊस ऑफ लॉर्डस् चे सदस्य लॉर्ड भिकू पारेख, खगोल भौतिकशास्त्रज्ञ प्रो. जयंत नारळीकर, सध्याच्या अर्थमंत्री निर्मला सिथारामन, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन, इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. के. राधाकृष्णन, पद्मश्री डॉ. कर्नाम मल्लेश्वरी, पद्मश्री डॉ. दीपा मलिक, यांच्यासारख्या असंख्य प्रतिभावंतांनी विचारपुष्पे गुंफलेली आहेत.

Related Stories

सांगे मतदारसंघात तृणमूलचा कोपरा बैठकांचा सपाटा

Abhijeet Khandekar

संचालक पदाचा ताबा नितीन रायकर यांच्याकडे

Amit Kulkarni

जुन्या इमारतीचे काँक्रिटचे तुकडे कोसळून युवती जखमी

Amit Kulkarni

दिवाडीतील क्रीडापटूंना मदत करणार

Amit Kulkarni

तिन्ही संशयिताविरुद्ध उद्या कोर्टात आरोप निश्चित शक्य

Amit Kulkarni

स्वावलंबी, यशस्वीनी योजनांचा आज शुभारंभ

Patil_p