फुगे उडवून राष्ट्रवादीचे आंदोलन, पेढे वाटून केला आनंदोत्सव
प्रतिनिधी/ सातारा
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर कऊन देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रमेश बैस यांची राज्यपाल म्हणून नियुक्ती करताच साताऱ्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोवई नाक्यावर हवेत फुग्यांबरोबर माजी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची प्रतिमा सोडून व पोवई नाका येथे पेढे वाटून जल्लोष केला. दरम्यान, कोश्यारी बाय बाय… अशा घोषणा देण्यात आल्या.
राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे यांनी काही क्षणात फोनवऊन कार्यक्रमाची ऊपरेषा कार्यकर्त्यांना समजून सांगताच कार्यकर्ते पोवई नाक्यावर फुगे घेऊनच जमले. त्या फुग्यांना कोश्यारी यांची प्रतिमा लावली होती. ती प्रतिमा फुग्यांसोबत हवेत सोडण्यात आली. दरम्यान, पोवई नाक्यावर पेढे वाटण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, महिला जिल्हाध्यक्षा संमिद्रा जाधव, विद्यार्थी सेलचे अतुल शिंदे, युवकचे प्रदेश कार्यकारणीचे गोरखनाथ नलावडे, अॅड. वैभव मोरे यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी तेजस शिंदे म्हणाले, काही वर्षांपासून राज्यपाल कोश्यारीसाहेब यांनी महाराष्ट्राच्या महापुऊषांबद्दल आणि महाराष्ट्राचा वारंवार अपमान करत आले आहेत. काल कुठेतरी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. त्यांना सोडून जायचे आदेश भेटलेले आहेत. त्यानिमित्ताने जल्लोष पेढे वाटून करत आहोत. त्यांना महाराष्ट्रातून बाय बाय म्हणून आम्ही फुगे पाठवत आहोत, असे त्यांनी सांगितले.