ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्यातील येरवडा येथील बालसुधारगृहातून कोयता गँगचे 8 सदस्य पळून गेले आहेत. या अल्पवयीन आरोपींनी भर दिवसा संस्थेच्या सरंक्षण भिंतीला शिडी लावून खिडकी तोडून पलायन केले.
मागील काही दिवसांपासून पुणे शहरात कोयता गँग धुमाकूळ घालत आहे. याच गँगमधील 8 अल्पवयीन आरोपींना येरवड्यातील पंडित जवाहरलाल नेहरू बालसुधारगृहात ठेवण्यात आले होते. बालसुधारगृहात या आरोपींचे समुपदेशन करण्यात येते. विविध सत्रांसाठी त्यांना बाहेर आणले जाते. याच संधीचा फायदा घेत या गँगमधील 8 आरोपींनी आवारातील एका खिडकीला शिडी लावली आणि खिडकी तोडून तेथून पळ काढला. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथकं रवाना झाली आहेत.
अधिक वाचा : अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी