सीगन चषक क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
युनियन जिमखाना आयोजित सीगन चषक वरि÷ क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून के. आर. शेट्टी किंग्स संघाने टिळकवाडी क्रिकेट संघाचा 7 धावांनी तर बेळगाव ग्लॅडिएटर्स संघाने सीगन क्रिकेट क्लबचा 75 धावानी पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. सुनील सक्री, सिद्धेश साळवी यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आले.
जिमखाना मैदानावर झालेल्या पहिल्या सामन्यात के. आर. शेट्टी संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 150 धावा केल्या. सुनील सक्रीने 2 षटकार 2 चौकारासह 39, रोहित देसाईने 4 चौकारासह 30 तर प्रणय शेट्टीने 1 षटकार 1 चौकारासह 26 धावा केल्या. टिळकवाडीतर्फे ओंकारने 18 धावात 2 तर अर्जुनने 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना टिळकवाडी क्रिकेट क्लब संघाने 20 षटकात 7 बाद 143 धावाच केल्या. शिवम यादवने 3 चौकारासह 48 तर ओंकार पाटीलने 2 चौकारासह 26 धावा केल्या. के. आर. शेट्टीतर्फे अनंत माळवीने 32 धावात 2 तर सुनील सक्रीने 23 धावात 2 गडी बाद केले.
दुसऱया सामन्यात बेळगाव ग्लॅडिएटर्सने प्रथम फलंदाजी करताना 18 षटकात 8 बाद 146 धावा केल्या. त्यात मोहसीनने 1 षटकार 4 चौकारासह 32, अलीमने 3 षटकार 1 चौकारासह 26 तर अझहरने 24 धावा केल्या. सीगनतर्फे राहुलने 38 धावात 4 तर शिवाजीने 21 धावात 2 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना सीगन संघाचा डाव 12.5 षटकात सर्व बाद 74 धावात आटोपला. भावीतने 3 चौकारासह 21 तर कपिलने 12 धावा केल्या. बेळगाव ग्लॅडिएटर्सतर्फे सिद्धेशने 3 धावात 3, शुभमने 13 धावात 3, निखीलने 26 धावात 3 गडी बाद केले. सामन्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सामनावीर सुनील सक्री, सिद्धेश साळवी यांना तर इम्पॅक्ट खेळाडू शिवम यादव व राहुल यांना चषक देवून गौरविण्यात आले.