नरेंद्र कुलकर्णी चषक टी-20 क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : सिग्निचर स्पोर्टस क्लब आयोजित चौथ्या नरेंद्र कुलकर्णी स्मृती चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या उदघाटन सामन्यातून के.आर. शेट्टी संघाने युनायटेड बालाजी संघाचा 6 गड्यांनी तर सिगन स्पार्टस क्लबने बेळगाव स्पोर्टस क्लबचा 4 गड्यांनी पराभव करून विजयी सलामी दिली. युनियन जिमखाना मैदानावर या स्पर्धेच्या उदघटनप्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून चंदन कुंदरनाड, अभिजीत भोवीते, गजानन जैनोजी, स्वप्नील पुजारी, गजानन सिंदलींग, मिंलिद चव्हाण, प्रणय शेट्टी, विद्युल बेडका, चेतन, परशुराम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. पाहुण्यांच्याहस्ते यष्टीचे पूजन करून स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. पहिल्या सामन्यात युनायटेड बालाजी संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 गडीबाद 143 धावा केल्या. त्यात सुनील लमाणीने 4 चौकारासह 25, वासु लमानीने 2 चौकारासह 24 धावा केल्या. के. आर. शेट्टीतर्फे नागराज रोट्टीने 14 धावात 3, सलमान गोकाक व मिलिंद बेळगावकर आणि
प्रत्येकी 2 गडीबाद केले. प्रत्त्युतरादाखल खेळताना के. आर. शेट्टीने संघाने 18. 3 षटकात 4 गडी बाद 144 धावा केल्या. त्यात प्रशांत लायंदरने 1 षटकार 4 चौकारासह 43 तर प्रणय शेट्टीने 2 षटकार 2 चौकारासह 36 धावा केल्या. युनायटेड बालाजीतर्फे अजित सोंदेकरने 2 तर राजेश व यश यानी प्रत्येकी 1 गडीबाद केला. दुसऱ्या सामन्यात बेळगाव स्पोर्टस क्लबने प्रथम फलंदाजी करताने 20 षटकात 8 गडी बाद 102 धावा केल्या. त्यात प्रविण कराडेने 3 चौकारास 34, पवन जी ने 23 धावा केल्या. सिगन स्पोर्टसतर्फे सचिन कुलकर्णी 16 धावात 3 तर राहुल बजंत्रीने 2 गडीबाद केल्या. प्रत्त्युतरादाखल खेळताना सिगन स्पोर्टसने 16. 3 षटकात 6 गडी बाद 103 धावा करून सामना 4 गड्यांनी ज्ंिांकला त्यात विजय कुरीने 4 चौकारासह 21 तर भावित पुजारीने 1 षटकात 2 चौकारासह 19 धावा केल्या. बीएससीतर्फे दिपक द्राक्षेने 21 धावात 3, बाबु कदमने 1 गडी बाद केला. सामन्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्याहस्ते सामनावीर प्रशांत लायंदर व इम्पॅक्ट खेळाडून वासु लमानी यांना बाळकृष्ण पाटील, योगेश जाधव तर दुसऱ्या सामन्यात राहुल बजंत्री, इम्पॅक्ट खेळाडू सचिन कुलकर्णी यांना विद्युल बेडका, संतोष चव्हाण व चेतन यांच्याहस्ते चषक देऊन गौरविण्यात आले.