क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक ऍथलेटिक्स संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय 20 वर्षाखालील मुला- मुलींच्या व खुल्या पुरुष आणि महिला ऍथलेटिक्स स्पर्धेत क्रीडाभारती डायनॅमिक स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले.
उडुपी येथे झालेल्या राज्यस्तरीय ऍथलेटीक्स स्पर्धेत क्रीडाभारतीच्या (डायनॅमिक स्पोर्ट्स क्लब) खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली. अरुण माळवीने 3000 व 5000 मी. धावण्याच्या स्पर्धेत दोन रौप्य, टिना वानखेडेने 3000 मी.मध्ये रौप्य, श्रावणी भाटेने 400 मी अडथळा शर्यतीत रौप्य, शितल कातकरने 3000 मी.मध्ये कांस्य, अपूर्वा नाईकने 100 मी. अडथळा शर्यतीत कांस्य, लक्ष्मण पाटील 3000 मी. चौथा क्रमांक आणि 5000 मी. शर्यती कांस्य, वैष्णवी बुद्रुकने तिहेरी उडीत कांस्यपदक मिळविले. वरील खेळाडू व्हॅक्सिन डेपो मैदानावर सराव करत असून त्यांना ऍथलेटीक्स प्रशिक्षक ए. बी. शिंत्रे, उमेश बेळगुंदकर, सुरज पाटील, मधुकर देसाई यांचे मार्गदर्शन लाभत आहे.