Tarun Bharat

कंठातून निघाला कृष्ण….

शस्त्रक्रिया करुन कृष्ण काढला बाहेर

 प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

कंठातून काढला कृष्ण…. आश्चर्य वाटले ना. परंतु खरोखरच डॉक्टरांनी घशावर शस्त्रक्रिया करुन एका व्यक्तीने गिळलेली श्रीकृष्णाची धातुची मूर्ती बाहेर काढुन त्या व्यक्तीला दिलासा दिला आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, 45 वर्षीय व्यक्ती नेहमी प्रमाणे पूजा करुन तीर्थ पित असताना न कळत त्याने धातूचा कृष्णही गिळला. त्याचा घसा दुखू लाल्याने एक्सरे काढण्यात आला. तेंव्हा घशामध्ये कृष्णाची मूर्ती असल्याचे आढळले.

याव्यक्तीला केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. एन्डोस्कोपी केल्यावर कृष्णाच्यामूर्तीचा डावा पाय अन्न नलीकेत आढळल्याचे स्पष्ट झाले. केएलईच्या ईएनटी विभागातील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुन कृष्णाची मूर्ती बाहेर काढली.

ईएनटी विभागाच्या डॉ. प्रिती हजारे. डॉ. विनिता मेटगुडमठ, भूलतज्ञ डॉ. चैतन्य कामत व अन्य सहकाऱयांनी ही शस्त्रक्रिया केली.

Related Stories

फ्रेंड्स ग्रुपच्यावतीने गरजूंना अन्नदान

Amit Kulkarni

म. ए. समिती महिला आघाडीतर्फे होमिओपॅथिक गोळय़ांचे वितरण

Patil_p

धामणे एस. येथे आढळला किंग कोब्रा

Amit Kulkarni

शिक्षकांच्या आंदोलनात तिघे अत्यवस्थ

Omkar B

कोजागरी पौर्णिमेदिवशी तालुका अंधारात

Amit Kulkarni

देवस्थान मंडळाच्या वतीने पावसासाठी गाऱहाणे

Amit Kulkarni
error: Content is protected !!