५ जून ला पर्यावरण दिना दिवशी मानवी साखळी करत निदर्शने करणार : पृथ्वीराज पवार
सांगली/प्रतिनिधी
कृष्णा नदीचा सांगलीतील बंधारा काढून म्हैसाळमध्ये नवा बंधारा उभारण्याचा प्रस्ताव मंजुरीच्या टप्प्यात आला असताना यावरून मतभेदांचे पाणी पुलाखालून वाहू लागले आहे. जलसंपदा मंत्र्यांनी हा प्रस्ताव अभ्यासाअंती सादर झाल्याचे स्पष्ट केले असले, तरी शहरातील राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी हा अभ्यास जनतेसमोर मांडण्याची मागणी केली आहे.
सांगलीत भाजपचे नेते पृथ्वीराज पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन कृष्णा नदीच्या सांगली बंधारा पाडण्यास विरोध दर्शवला असून येत्या ५ जूनला पर्यावरण दिनानिमित्त सांगलीकरांना घेऊन मानवी साखळी करून या बंधाऱ्यावर निदर्शने करण्यात येतील अशी माहिती भाजपचे नेते पृथ्वीराज पवार यांनी पत्रकार परिषदेत केली.