नवी दिल्ली
ऑनलाइन शिक्षण क्षेत्रातील बायजु कंपनीच्या अध्यक्षपदी कृष्णा वेदाती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जागतिक स्तरावर विस्तारासाठी व धोरण राबवण्यासाठी पुढील काळात त्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. वेदाती हे याआधी टींकरचे सीईओ व सहसंस्थापक पद सांभाळत होते. वेदाती हे यापुढे आपल्या कामाची माहिती बायजुचे सीईओ रविंद्रन यांना यापुढे देतील.