Tarun Bharat

वसगडेत कृष्णा कालव्याचे पाणी तुंबले

Advertisements

वसगडे/प्रतिनिधी

पलूस-सांगली राज्यमार्ग क्रमांक १४२ वरील वसगडे ता. पलूस येथील कृष्णा कॅनॉलवरती नाबार्ड योजने अंतर्गत छोट्या पुलाचे बांधकाम गेले दोन महिने झाले सुरु हाेते. खाेडशी धरणातुन कृष्णा कालव्यातून मार्च आवर्तनाचे येणारे अडीच टीएमसी पाणी काल रात्री वसगडे शिवारात पाेहचले. परंतु पुलाचे काम करणार्‍या ठेकेदाराने कॅनॉलमध्ये आडवी माती टाकल्याने माेठ्या प्रमाणात पाणी तुंबले आहे. त्यामुळे येळावी वाटेपर्यंत पाण्याचा फुगवटा निर्माण झाला आहे.

मध्यंतरी पावसामुळे कॅनॉल फुटून ग्रामस्थाच्या घरात पाणी शिरल्याची घटना घडली हाेती. आता कृष्णा कॅनॉलचे पाणी तुंबत असल्याने ग्रामस्थांमधून चिंता व्यक्त हाेऊ लागली आहे.

भरावासाठी टाकलेली माती काढून पाण्यासाठी वाट करुन देण्याचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. सार्वजनिक बांधकाम खाते जलसंपदा विभागाच्या समन्वयाअभावी हजाराे लिटर पाणी वाया जाऊन शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Related Stories

प्रियंका गांधींना काँग्रेसचा चेहरा बनवण्यासाठी राहुल गांधींचा होता विरोध; प्रशांत किशोर यांचा खुलासा

Archana Banage

नागपूरचे मनपा आयुक्त तुकाराम मुंडे यांना कोरोनाची बाधा

Tousif Mujawar

न्यू कॉलेजमध्ये जागतिक तृतीयपंथीय दिवस साजरा

Abhijeet Khandekar

राफेलचा हवाई दलात समावेश हा संपूर्ण जगासाठी कठोर संदेश : राजनाथ सिंह

Tousif Mujawar

Chhagan Bhujbal: मी सुद्धा हिंदू, छगन भुजबळांनी सरस्वती पूजनावर दिले स्पष्टीकरण

Archana Banage

जि.प.सभेत राडा, सदस्य अंगावर धावले

Archana Banage
error: Content is protected !!