गणपत चित्रपटाचे चित्रिकरण होणार
बॉलिवूडची परमसुंदरी क्रीति सेनॉन आगामी काळात अनेक चित्रपटांमध्ये दिसून येणार आहे. अभिनेत्री क्रीति गणपत या चित्रपटाच्या अखेरच्या शूटिंगसाठी लडाख येथे जाणार असल्याचे समजते. या चित्रपटात क्रीति सेनॉन अभिनेता टायगर श्रॉफ सोबत जबरदस्त ऍक्शनदृश्ये करताना दिसून येणार आहे.
लडाखमधील गणपतचे चित्रिकरण 15 दिवसांमध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. गणपत एक डिस्टोपियन थ्रिलर स्वरुपाचा चित्रपट असून यात क्रीति आणि टायगर हे मुख्य भूमिकेत आहेत. विकास बहल यांच्याकडून दिग्दर्शित या चित्रपटात या दोघांची जोडी पुन्हा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. जस्सी ही भूमिका क्रीति साकारणार आहे. या चित्रपटाची निर्मिती पूजा एंटरटेनमेंटच्या बॅनर अंतर्गत केली जात आहे. हा चित्रपट नाताळावेळी प्रदर्शित केला जाणार आहे.
क्रीति आणि टायगर ही जोडी यापूर्वी हीरोपंती या चित्रपटात दिसून आली होती. हा या दोघांचा बॉलिवूड पदार्पणाचा चित्रपट होता. त्यांच्या जोडीला प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळाली होती. क्रीति आगामी काळात आदिपुरुष, भेडिया, शहजादा यासारख्या चित्रपटांमध्ये दिसून येणार आहे. अलिकडेच ती बच्चन पांडे या चित्रपटात अक्षय कुमारसोबत झळकली होती.