अभिनेता प्रतीक गांधीसोबत झळकणार
टीव्ही अभिनेत्री कृतिका कामरा अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ‘हश हश’ या वेबसीरिजच्या यशाचा आनंद घेत आहे. अभिनेत्री आता हेरगिरीवर आधारित ‘फॉर युवर आइज ओन्ली’ या वेबशोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता प्रतीक गांधीसोबत कृतिका आता नेटफ्लिक्स इंडिया ओरिजिनलमध्ये स्क्रीन शेअर करताना दिसून येणार आहे.
स्कॅम 1992 चे लेखक सुमित पुरोहित यांच्याकडून ‘फॉर युवर आइज ओन्ली’ ही सीरिज बॉम्बे फेबल्स मोशन पिक्चर्स या बॅनर अंतर्गत निर्माण केली जाणार आहे. या सीरिजला ग्लोबल ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर स्ट्रीम करण्यात येणार आहे. कृतिका यात प्रतीक गांधीची नायिका म्हणून झळकणार आहे. या सीरिजचे चित्रिकरण सुरू झाले आहे. चित्रिकरणाचा पुढील टप्पा चंदीगडमध्ये पार पडणार आहे.
‘फॉर युवर आइज ओन्ली’ हा कृतिका कामराचा सुमित पुरोहितसोबतचा पहिला प्रोजेक्ट असणार आहे. तर प्रतीक गांधी स्वतःच्या स्कॅम 1992 च्या लेखकासोबत पुन्हा जोडला जाणार आहे. टीव्हीवर स्वतःच्या अभिनयाचा प्रवास सुरू केल्यावर कृतिकाने आता वेबसीरिज अन् चित्रपटांची वाट पकडली आहे. कृतिकाने यापूर्वी तांडव, कौन बनेगी शिखरवती आणि अलिकडेच प्रदर्शित ‘हश हश’मधून स्वतःच्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली आहे.