Tarun Bharat

कृषिकन्या करताहेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

प्रथमच आंबा, काजू व नारळ फळपिकांच्या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी उपक्रम : लोरे गावातून या मार्गदर्शनाचा झाला शुभारंभ

 वार्ताहर / वेंगुर्ले

Advertisements

कोकणातील मुख्य पीक असलेले भात शेतीचे उत्पादन, आधुनिक शेती तंत्रज्ञान या बरोबरच प्रथमच आंबा, काजू व नारळ या पिकांवर होणाऱ्या किटकांच्या प्रादुर्भावातून पिके कशी वाचवावीत. याचे डेमोव्दारे प्रात्यक्षित दाखवून या फळपिकांचे नुकसान कसे टाळावे. याचे मार्गदर्शन करीत आहेत.

ग्रामीण कृषी जागृकता विकास योजना कार्यानुभव प्रकल्प अंतर्गत कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय फोंडाघाट येथील चतुर्थ वर्ष कृषी पदवी मध्ये शिकणाऱ्या कृषिकन्या तनया सावंत, ईश्वरी भोगटे, तन्वी देसाई, पूजा गवंडळकर, तन्वी राणे, धनश्री ढवण, रुदाली मासये यांचे लोरे गावचे येथील सरपंच अजय रावराणे यांचेसह शेतकरी व ग्रामस्थांनी स्वागत केले.

यावेळी शेतीतील नवीन तंत्रज्ञान पीक पध्दती कीड व रोग नियंत्रण व्यवस्थापन आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कशी फायदेशीर असते. आपल्या  कोकणातील मुख्य पीक असलेले भात शेतीचे उत्पादन, आधुनिक शेती तंत्रज्ञानाने तसेच या भागांत दरवर्षी आंबा, काजू व नारळ या महत्वपूर्ण उत्पन्न देणाऱ्या फळबागायतीवर होणाऱ्या तुडतुडे, भुरी, करपा, कोळी या रोगांविषयी व ते नष्ट करण्यासाठीच्या उपाय योजनांची माहिती तज्ञांमार्फत देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकते. यावर आधारीत प्रात्यक्षिके, शेतकरी मेळावा, तज्ञांचे कृषी विषयक मार्गदर्शन, डेमो इत्यादीचे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन या प्रकल्पामधून होत आहे. तसेच कृषिकन्यांनी गावातील शेतकऱ्यांच्या शेतीतील समस्या पशुपालन व्यवसाय सेंद्रिय व रासायनिक बीजप्रक्रिया व माती परीक्षण याबद्दल जागरुकता ग्रामस्थांना करून दिली. या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. श्री मोहिते डॉ. योगेश जंगले आणि इतर प्राध्यापक कृषिअधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Stories

रत्नागिरी : चिपळुण येथे जुगार अड्ड्यावर छापा, सहाजण अटक

Abhijeet Shinde

ग्रामीण पोलिसांकडून विनाकारण फिरणाऱया 5 जणांवर गुन्हा

Patil_p

‘सोन्याच्या पावलांनी…मोत्याच्या पावलांनी’ आली गौराई

Patil_p

शिवसेनेची ‘बळीराजा आत्मविश्वास यात्रा’

NIKHIL_N

तीन कोरोनाबाधित डॉक्टर करताहेत रूग्णसेवा!

Patil_p

विमानसेवेसाठी ऑनलाईन बूकिंग सुरू

NIKHIL_N
error: Content is protected !!