Tarun Bharat

कृष्णा नदीच्या पाणीपातळी वाढ; नागठाणे बंधारा पाण्याखाली

Advertisements

गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसाने नागठाणे परिसरातील शिवार जलमय झाले आहे.पलूस तालुक्यात आज सकाळपासून पावसचा जोर ओसरला असला तरी कृष्णा नदी ओसंडून वाहत असून पाणी नदीच्या पात्राबाहेर पडत आहे. गेल्या चोवीस तासात नागठाणे बंधारा पाण्याखाली गेला आहे. पाणी पातळीत २.५ फुटांची वाढ झाली आहे. आज सकाळी 9.30 वाजता नागठाणे बंधारा पाण्याखाली गेला असून पाणी पातळीत वाढ होत आहे. यामुळे नागठाणे गावाचा शिरगाव नागराळे गावाशी संपर्क तुटला आहे.

अनुचित प्रकार टाळण्यासाठी भिलवडी व आष्टा पोलिस स्टेशनच्या वतीने बंधाऱ्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.यावेळी आष्टा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक आप्पासाहेब पडळकर पोलिस कॉस्टेबल अभिजित नायकवडी यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. यावेळी ग्रामसेवक ए डी पवार,तलाठी निहाल अत्तार,पोलिस पाटील दिपक कराडकर व ग्रांमपंचायतचे कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

सांगली : ‘विद्यामंदिर’चे माजी मुख्याध्यापक ग्रामोपाध्ये सरांचे निधन

Abhijeet Shinde

कोरोनाबाधित आरोपीने रुग्णालयातून ठोकली धूम

Abhijeet Shinde

तांबवे दंडभाग परिसरात ट्रॅक्टर चालकास लुटमारीचा प्रयत्न

Abhijeet Shinde

शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिनकर पाटलांसह तिघांना अटक

Abhijeet Shinde

सांगलीत पावसाची उसंत, पुराने हाहाकार

Abhijeet Shinde

नेर्लेत युवकाची आत्महत्या

Abhijeet Shinde
error: Content is protected !!