कँटर आणि केएसआरटीसी बसच्या झालेल्या भीषण धडकेत एका विध्यार्थ्यांच्या शरीराचे दोन हिस्से झाल्याची दुर्दैवी घटना बागलकोट जिल्ह्यातील गद्दनकेरी येथील श्री इटगी भीमम्मा मंदिर जवळ घडली आहे.
अरकेरीचे रहिवासी राहुल अशी मृताची ओळख पटली आहे. अमलजरीहून बागलकोटला जाणाऱ्या बसला बेळगावच्या दिशेने येणाऱ्या कँटरने भीषण धडक दिली. यामुळे बसवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या उतरतीला बस खाली घसरली. या अपघातात राहुलचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्याच्या शरीराचे दोन हिस्से झाले आहे. तसेच या बसमधील काही प्रवासी जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे.