प्रतिनिधी /धारबांदोडा
कुळे येथील अवर लेडी ऑफ पाईटी हायस्कूलच्या पालक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी दिनेश देसाई यांची निवड करण्यात आली. 2022-2024 सालासाठी या नूतन समितीची निवड करण्यात आली आहे.
इतर पदाधिकारी पुढील प्रमाणे – उपाध्यक्ष मुक्ता देसाई, खजिनदार सविता खांडेपारकर, सहखजिनदार जानो दमेकर, सचिव शिक्षिका अपर्णा मनसे, सहसचिव शिक्षिका राजेश्वरी राजेश, सदस्य चंद्रशेखर नाईक, शामंत मुळवी, नेहा मडकईकर व नेल्सन फर्नांडिस यांची निवड करण्यात आली.