Kumbharmath villagers warn public works department of roadblock
कुंभारमाठ गावातील मालवण- कसाल राज्यमार्ग वर जरीमरी घाटी येथील 1000 मीटरच्या रस्तावर असंख्य खड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असुन यामुळे वाहनचालक हैराण झाले आहेत.दररोज अपघात मालिका सुरू आहे .सदर रस्त्याचे आठ दिवसात योग्य डांबरीकरण न झाल्यास रास्तारोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा सार्वजनिक बांधकाम मालवण विभागला देण्यात आला . याप्रसंगी सरपंच प्रमोद भोगावकर ,ग्रा.प.सदस्य विनोद भोगावकर युवासेना उपविभागप्रमुख राहुल परब,ग्रामस्थ दामोदर गवई,योगेश बिळवसकर,घुमडे ग्रामस्थ नंदकुमार वस्त आदी उपस्थित होते.
मालवण / प्रतिनिधी