Tarun Bharat

इस्टबोर्न स्पर्धेत क्विटोव्हा विजेती

वृत्तसंस्था/ लंडन  (ब्रिटन)

डब्ल्यूटीए टूरवरील शनिवारी येथे झालेल्या 2022 च्या इस्टबोर्न ग्रासकोर्ट महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत झेक प्रजासत्ताकच्या पेत्र क्विटोव्हाने एकेरीचे जेतेपद मिळविताना विद्यमान विजेत्या ओस्टापेंकोचा पराभव केला.

विम्बल्डन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेपूर्वीची ही शेवटची सरावाची स्पर्धा होती. शनिवारी झालेल्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात क्विटोव्हाने ओस्टापेंकोचा 6-3, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. क्विटोव्हाचे डब्ल्यूटीए टूरवरील हे 29 वे विजेतेपद असून गेल्या वर्षभराच्या कालावधीतील तिचे हे पहिले अजिंक्यपद आहे. क्विटोव्हाने यापूर्वी दोनवेळा विम्बल्डन स्पर्धा जिंकली आहे. क्विटोव्हा आता विम्बल्डन स्पर्धेत सहभागी होणार आहे. 

Related Stories

सध्याच्या संघात केवळ दोनच रोल मॉडेल

Patil_p

थापा, हुसामुद्दीन यांना सुवर्णपदके

Patil_p

लुका मोड्रीकच्या करारात वाढ

Patil_p

टोकियोत सिंधू सुवर्ण जिंकू शकेल – गोपीचंद

Patil_p

वर्ल्डकपसाठी ‘संकट’, आयपीएलसाठी ‘संधी’!

Patil_p

ब्रिटनच्या मरेची विजयी सलामी

Amit Kulkarni