Tarun Bharat

किर्गीओस, कॅस्पर रुड विजयी

Advertisements

वृत्तसंस्था/ माँट्रियल

एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या कॅनेडीयन पुरुषांच्या खुल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा निक किर्गीओस तसेच कॅस्पर रुड यांनी विजय नोंदवित उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला.

या स्पर्धेत गुरुवारी झालेल्या पुरुष एकेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या किर्गीओसने या स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड कायम राखताना आपल्याच देशाच्या ऍलेक्स डी मिनॉरचा 6-2, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. या सामन्यात किर्गीओसने पहिले चार गेम्स केवळ 11 मिनिटात जिंकले. या स्पर्धेतील दुसऱया एका सामन्यात कॅस्पर रुडने स्पेनच्या रॉबर्टो ऍगटचा 6-7(4-7), 7-6 (7-4), 6-4 असा पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले. हा सामना सव्वातीन तास चालला होता. रुडचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना कॅनडाच्या फेलिक्स ऍलीसिमेबरोबर होणार आहे.

Related Stories

मिझोरामचे क्रिकेट प्रशिक्षक लोधगर कालवश

Patil_p

एफसी गोवाची जमशेदपूरवर मात, इगोर अँग्युलोचे दोन गोल

Omkar B

हॉलंड, पाक दौऱयासाठी होल्डरला विश्रांती

Patil_p

भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेत गोलंदाजच निर्णायक ठरतील

Patil_p

फुटबॉल फेडरेशनतर्फे अन्वर अलीला पर्यायी ऑफर

Patil_p

कुदनूरचा वेगसम्राट ‘हरण्या’चा मृत्यू

Omkar B
error: Content is protected !!