वृत्तसंस्था/ टोकियो
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या जपान खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेतून ऑस्ट्रेलियाचा टेनिसपटू निक किर्गिओसने गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे या स्पर्धेतून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला.
या स्पर्धेमध्ये ऑस्ट्रेलियाच्या किर्गिओसने एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. शुक्रवारी उपांत्यपूर्व फेरीचा सामना सुरू होण्यास केवळ काही मिनिटे बाकी असताना किर्गिओसने आपण या स्पर्धेतून माघार घेतल्याचे जाहीर केले. त्याच्या डाव्या गुडघ्याला बरीच सूज आली असून त्याला सातत्याने वेदनाही जाणवत आहेत. अमेरिकेचा फ्रिज आणि किर्गिओस यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळविला जाणार होता. किर्गिओसने या स्पर्धेतून माघार घेतल्याने फ्रिजला उपांत्य फेरीसाठी पुढे चाल मिळाली आहे. किर्गिओसने गुरुवारी या स्पर्धेत दुसऱया फेरीतील सामन्यात पोलंडच्या मॅझेकचा 3-6, 6-2, 6-2 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले होते.