Tarun Bharat

कामगार मंत्री सुरेश खाडे यांची सांगली दै. तरुण भारत कार्यालयास भेट

ऑनलाईन टीम/तरुण भारत

एक कामगार ते कामगारमंत्री हा प्रवास माझ्यासाठी सुखद आहे. कामगार म्हणून काम केल्याने कामगारांच्या प्रश्नांची जाण आहे. त्यामुळे कामगार मंत्रालयाची माध्यमातून कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे मत कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी व्यक्त केले. जिल्हयात कामगार भवन व हॉस्पिटल उमारणार असल्याचेही डॉ. खाडे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

कामगारमंत्री डॉ खाडे यांनी आज ‘तरुण भारत कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. संपादक मंगेश मंत्री यांनी तरुण भारत परिवाराच्यावतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देत त्यांनी स्वागत केले. मंत्री खाडे यांनी तरुण भारतचे संस्थापक कै. बाबुराव ठाकुर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. माझ्या राजकिय, सामाजिक जीवनामध्ये ‘तरुण भारतचे नेहमीच पाठबळ मिळाले आहे, असे सांगत डॉ. खाडे कामगार मंत्र्यानी या मंत्रीपदाच्या माध्यमातून पारदर्शक आणि कामगारभिमुख कारभार केला जाईल, स्वतः कामगार म्हणून काम केल्याने कामगाराचे प्रश्न माहित आहेत. जिल्हयातील तरुणांना रोजगारांसाठी स्थलांतर व्हावे लागते ही वस्तुस्थिती आहे. या पुढच्या काळात नवे उद्योग निर्माण करु त्यामाध्यमातून प्रत्येकाला काम मिळावे यासाठी प्रयत्नशील आहे, असे ते म्हणाले.

जिल्ह्यात कामगार भवन व हॉस्पिटल उभारणार आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना जागा सुचविण्याच्या सूचना केल्या आहेत. निधीही उपलब्ध आहे. जागा मिळाल्यास तातडीने काम सुरु करण्यात येईल. पत्रकारांसाठी घरकुल व पत्रकार भवन बांधण्यासाठी प्रयत्न करु, अशी ग्वाही डॉ. खाडे यांनी यावेळी बोलताना दिली. संपादक मंगेश मंत्री म्हणाले, स्थानिक मुलांना नोकऱ्या नाहीत. नोकऱ्यांंसाठी तरुणांना पुण्यासारख्या जिल्ह्यात जावे लागते. तरुणांना जिल्ह्यात नोकऱ्या मिळाव्यात यासाठी डॉ खाडे यांनी कामगार मंत्रालयाच्या माध्यमातून प्रयत्न करावेत.

यावेळी मोहन व्हनकडे माजी स्थायी समिती सभापती, पाडुरंग कोरे, नगरसेवक प्रकाश ढंग, मोहन वाटवे, जाहिरात व्यवस्थापक संजीव डाळीवर, मुख्यप्रतिनिधी संजय गायकवाड, संगणक विभाग प्रमुख गजानन घाडगे, शहर प्रतिनिधी विनायक जापन, रावसाहेब हजारे, सचिन ठाणेकर, विक्रम चव्हाण, मिरज शहर मुख्य प्रतिनिधी के. के. जाधव, प्रशांत नाईक, कार्यालय व्यवस्थापक राहूल गोखले यांच्यासह तरुणभारतचे सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Related Stories

परदेश शिष्यवृत्तीसाठी 30 जून पर्यंत मुदतवाढ

Archana Banage

सांगली : गाढवाची वरात महावितरणच्या दारात

Archana Banage

कराड-रत्नागिरी महामार्ग २ तासासाठी रोखला

Archana Banage

देवेंद्र फडणवीस,प्रवीण दरेकर गुरुवारी सांगली दौर्‍यावर

Archana Banage

शेतकरी, व्यापाऱ्यांच्या मदतीसाठी सांगलीत निदर्शने

Archana Banage

सांगली : कुपवाड पोलिसांनी तीनपानी जुगारअड्डा केला उध्वस्त, ७ जण अटकेत

Archana Banage