ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पूर्व लडाखमध्ये चीन आता भारताविरोधात नवी खेळी खेळत आहे. चीनने फिंगर 4 क्षेत्रात LAC वर लाऊडस्पीकर बसवले असून, चीन त्यावर पंजाबी गाणी वाजवत आहे. तणावग्रस्त परिस्थितीत चीन भारताला चिथावण्याचा प्रयत्न करत आहे.
फिंगर 4 परिसरात ज्या ठिकाणी चिनी सैनिकांनी लाऊडस्पीकरल लावले आहेत तो परिसर भारतीय जवानांच्या देखरेखीखाली आहे. तिथे शीख सैन्यही तैनात आहे. त्यामुळे भारतीय सैन्याला विचलित करून त्यांच्यावर मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न चीनकडून सुरू आहे.
पँगाँग सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावरील फिंगर्सवर वर्चस्व मिळवण्याच्या उद्देशाने चीन कुरापती करत आहे. मागील 20 दिवसात भारत आणि चिनी सैन्याने 3 वेळा हवेत गोळीबार केला आहे.