Tarun Bharat

लडाख ; भटकंती करणाऱ्यांसाठी भन्नाट डेस्टिनेशन

अनुजा कुडतरकर

Ladakh; A wonderful destination for wanderers

प्रत्येकाच्या आयुष्यात त्याचं असं फ़िरण्याचं डेस्टिनेशन ठरवलेलं असतं . मनसोक्त देश विदेशाची भटकंती करायला कोणाला नाही आवडत ? खरं तर माणसाने पर्यटन केलंच पाहिजे . रोजच्या धकाधकीच्या जीवनातून , ताणातून जरा वेळ तरी मुक्त व्हायचं असेल तर हेच फिरणं तुम्हांला वेगळी ताकद देऊन जातं . सकारात्मकता देऊन जातं .पर्यटनात नवीन माणसं भेटतात , अनुभव मिळतात . प्रत्येक प्रदेश कसा आहे , तिथली जीवनशैली कशी आहे , आचार – विचार कसे आहेत हे जाणून घेता येतं . म्हणून प्रत्येकाने आयुष्यात भटकंतीला महत्त्व दिलं पाहिजे .ज्यांना भरपूर भटकंती करायचीय , उंचच उंच पहाड न्ह्याहाळायचेत त्यांनी लडाख या भारतातील सुंदर प्रदेशाला भेट दिलीच पाहिजे . सुंदर, मनमोहक, निसर्गरम्य असं बरच काही या प्रदेशाला म्हणता येईल .

भारताच्या सर्वात उत्तरेकडे लपलेल्या ह्या हिऱ्याबद्दल बोलताना प्रवास प्रेमींना विशेषणं कमी पडू लागतात. पूर्वी जास्त करून विदेशी पर्यटकांकडून Explore केला जाणारा हा प्रांत Bollywood अणि social media मुळे बहूसंख्य भारतीयांचे पसंतीचे पर्यटन स्थळ बनला. Bike Riders चे नंदनवन असेलेला हा दूर्गम आणि थंड हवेचा प्रदेश.मी एका अश्या ठिकाणाबाबत बोलतेय जिथे निसर्गाने स्वतःचेच नियम धाब्यावर बसवलेत. एक अनोखा भूभाग जो हिमालयातील बाकी निसर्गरम्य प्रदेशापेक्षा खूप आगळावेगळा आहे.

त्याला म्हणतात The Land of high passes – लडाख.लदाखला कसं जायचं, काय पाहायचं, कुठे राहायचं, काय खायचं, याला मर्यादा नाहीत . कारण इथलं वातावरणच असं आहे कि ते तुम्हांला तुमच्याकडे आकृष्ट करतंच . इथलं लोकजीवन धर्म , संस्कृती लोकांचं खडतर जीवन आणि त्या लोकांचे कष्ट देखील खूप आहेत . . येथील इतिहासाचा-भूगोलाचा-संस्कृतीचा अभ्यास प्रत्येकाने करायलाच हवा . खिंडी, सरोवरे, गोम्पा या पर्यटनस्थळांचीही तसेच रस्ते, देवता, नद्या, पठार, प्राणी या साऱ्या नैसर्गिक विविधतेची रचनाच न्यारी आहे .लडाख हे उन्हाळ्यातील पर्यटनासाठी भारतातील सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे. येथील नैसर्गिक सौंदर्य पाहाण्यासारखं आहे. लडाखमध्ये तलाव, दऱ्या, पर्वत पर्यटकांना आकर्षित करतात. अनेक पर्यटक बाईकवरून लडाखचा फेरफटका मारतात. लडाख हे भारतातील उन्हाळ्यातील सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी (Popular Summer Destinations) एक आहे. पर्यटक येथील मठांना भेट देऊ शकतात आणि पर्वतारोहण करून नवीन अनुभव घेऊ शकतात. याशिवाय लडाखमध्ये तलावांपासून ते दऱ्या आणि पर्वतांपर्यंत खूप काही (Summer Destinations in India) पाहण्यासारखे आहे. लडाख हे एक असे ठिकाण आहे, जिथले नैसर्गिक सौंदर्य आणि विहंगम दृश्ये पर्यटकांना मंत्रमुग्ध करतात. यामुळेच अनेक पर्यटक बाईकवरून लडाखचा फेरफटका मारतात आणि येथील ठिकाणे शोधतात. दिल्लीपासून 504 किमी अंतरावर आहे हिल स्टेशन औली, याला भारताचे मिनी स्वित्झर्लंड म्हणतात ते लडाखमध्ये आहे . अनेक प्राचीन बौद्ध मठ आहेत. त्यामुळे याला ‘लिटल तिबेट’ असेही म्हणतात. तसेच लडाख आणि तिबेटची आंतरराष्ट्रीय सीमा एकच आहे.

लडाखमध्ये तुम्हाला बौद्ध संस्कृती आणि खाद्यपदार्थांचा प्रभाव पाहायला मिळेल. तुम्ही अद्याप लडाखला भेट दिली नसेल. तर तुम्ही इथे जाऊन लेह आणि लडाखचा थरारक प्रवास अनुभवू शकता. लडाख हा बहुतांशी ओसाड जमीन आणि उंच पर्वत असलेला भाग असला, तरीही पर्यटकांना पाहण्यासारखी आणि एन्जॉय करण्यासारखी अनेक ठिकाणे तिथे आहेत.अशा प्रकारे अनेक भटकंतीप्रेमींसाठी लडाख हे डेस्टिनेशन नक्कीच सुंदर आहे ! इथे जाऊन निसर्गाच्या प्रेमात पडण्यासाठी .

Related Stories

ग्रा. पं. च्या सहाशे जागांसाठी 1087 उमेदवार रिंगणात

NIKHIL_N

‘सून सासू सून’ कार्यक्रमात राजापूरातील दोन सासू-सूनांचा सहभाग

Patil_p

किफायतशीर शेळीपालनासाठी 16 तरूणांचा पुढाकार

Patil_p

गणेशोत्सवानानंतर जिल्हय़ात पुन्हा लॉकडाऊन?

Patil_p

वेंगुर्ला-मठ येथील परिचारिका सायली गावडेचा खून

Anuja Kudatarkar

किनारपट्टीवर संरक्षक भिंत बांधणार

NIKHIL_N