Tarun Bharat

लडाख मधील अपघातात कोल्हापूर गडहिंग्लजचा जवान शहीद

कोल्हापूर प्रतिनिधी:

लडाखच्या तूर्तुक प्रांतामध्ये मराठा लाईट इन्फंट्रीच्या लष्कराचे वाहन श्योक नदीत कोसळून ७ जवान हुतात्मा झाले. यामध्ये महाराष्ट्रातील २ जवानांना वीरमरण प्राप्त झाले.

कोल्हापूरच्या (Kolhapur) गडहिंग्लज तालुक्यातील बसर्गे गावचे प्रशांत जाधव या अपघातात शहीद झाले. साताऱ्याच्या खटाव तालुक्यातील विसापूरचे सुभेदार विजय सर्जेराव शिंदे यांनाही वीरमरण आले. या दोन्ही जवानांचे पार्थिव आज बेळगावमध्ये आणण्यात येणार आहेत. प्रशांत जाधव यांचे पार्थिव त्यापश्चात गडहिंग्लज येथे नेण्यात येणार आहे. प्रशांत यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

तूर्तुक प्रांतामध्ये मराठा लाईट इन्फंट्री च्या २२ जवान आणि ४ अधिकाऱ्यांना घेऊन प्रवास करणाऱ्या लष्कराचे वाहन श्योक नदीत कोसळून लष्कराचे ७ जवान हुतात्मा झाले. प्रशांत २०१४ साली बेळगाव येथील ‘२२ मराठा लाईट इन्फंट्री’  यामधून सैन्यदलात भरती झाले होते. सैन्यदलामध्ये भरती होण्याची मोठी परंपरा असणाऱ्या बसर्गे गावच्या जाधव कुटुंबीयांमधील ते ११ वे जवान होते.

प्रशांत यांचे जानेवारी २०२० साली लग्न होते. त्यांना ११ महिन्याची मुलगी आहे. प्रशांत यांचे शिक्षण गडहिंग्लज मधील जागृती कनिष्ठ महाविद्यालयात झाले होते. नुकतेच २९ एप्रिल रोजी ते सुट्टी संपवून आपल्या कर्तव्यावर रुजू झाले होते. प्रशांत यांच्या निधनामुळे संपूर्ण गडहिंग्लज आणि कोल्हापूर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. या अपघातामुळे प्रशांत यांची ‘पैरा कमांडो’ होण्याची इच्छा अपुरी राहिली याची चर्चा होत आहे.

Related Stories

रविकांत तुपकरांची ऑन दी स्पॉट मोहीम

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यात दुपारी चार वाजेपर्यंत २४४ पॉझिटिव्ह

Archana Banage

पंतप्रधान मोदींना ‘टुचूक’

datta jadhav

खुपिरे राष्ट्रीय पेयजल योजनेचे खासदार मंडलिक यांच्या हस्ते उद्घाटन

Archana Banage

भाजपविरोधात उद्या ‘माफी मांगो’ आंदोलन

datta jadhav

एटीएम कॅश व्हॅन घेऊन चालक फरार

datta jadhav