Tarun Bharat

लैला शुगर कारखान्याचा गळीत हंगाम सुरु

प्रतिनिधी / खानापूर : महालक्ष्मी संचलित लैला शुगर कारखान्याचा गळीत हंगामाची सुरुवात उसाची मोळी पूजन व गव्हाणीत टाकून करण्यात आली. यावर्षीच्या गळीत हंगामाची सुरुवात करताना राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी महालक्ष्मी लैला कारखान्याचे चेअरमन विठ्ठल हलगेकर, रामदास महाराज चन्न बसव देवरू रुद्रस्वामी, पीर सिंगनाथ शंभू लिंग शिवाचार्य शिवपुत्र महास्वामी सिद्धेश्वर आडवी सिद्धेश्वर चेनवीर स्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आली.

प्रथम कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे संस्थापक माजी आमदार कै. निळकंठराव सरदेसाई यांच्या पुतळा चौथरा भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर या वर्षीच्या गळीत हंगामाची सुरुवात करण्यात आली. शेतकरी व कारखाना हे दोन्ही टीकले पाहीजेत यासाठी सुवर्णमध्य काढून कारखाना चालवण्यात यावा तसेच या माध्यमातून इथेनॉल तसेच साखर कारखान्याच्या इतर उत्पादनांच्या निर्मितीत लक्ष घालून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा कसा होईल याचे नियोजन करावे असे राज्य सभासदस्य घरांच्या कडाडी म्हणाले.

यावेळी विठ्ठल हलगेकर यांनी कारखाना खानापूर तालुक्यातील भागधारकांच्या मालकीचा असल्याने आज साखर कारखानदारी नुकसानीत आहे. मात्र खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून आम्ही ही जोखीम उचललेली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहकार्याची भूमिका ठेवावी एफआरपी देण्याचा आमचा निश्चित प्रयत्न राहील मागील वर्षी एफआरपीपेक्षा 75 रुपये जास्ती दर दिला आहे यावर्षीही तोच प्रयत्न राहील 2500 रु पहीला हप्ता दर घोषीत करण्यात आला आहे. यावर्षी पाच लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस पाठवून सहकार्य करावे असे आवाहन हलगेकर यांनी केले. कारखान्याचे कार्यकारी संचालक सदानंद पाटील यांनी यावेळी कारखान्याच्या प्रगतीचा आढावा सादर केला.

Related Stories

पुन्हा एकदा सेवा देण्यास अंजुमन सज्ज

Amit Kulkarni

गौरव देसाई राऊंड टेबल चेअरमनपदी

Amit Kulkarni

‘पुण्यकोटी दत्तक योजने’साठी नागरिकांचा पुढाकार आवश्यक

Patil_p

भाग्यनगर येथे आयबॉक्सतर्फे गॉगल्स प्रदर्शन

Omkar B

रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांची निदर्शने

Patil_p

खानापूर रोड स्मार्ट तर स्टेशनरोडची झाली दुर्दशा

Patil_p