बेळगाव : कित्तूर क्रीडा उत्सव कुस्ती स्पर्धेत हलगा-बस्तवाडची कन्या लक्ष्मी पाटील 60 किलो वजनी गटात विजेतेपदासह गदेची मानकरी ठरली. या कुस्ती स्पर्धेत लक्ष्मी पाटीलने पहिल्या सामन्यात बेळगाव युवजन क्रीडा खात्याच्या पवित्रा हिला चितपट करून विजय संपादन केला. उपांत्य सामन्यात मुधोळच्या प्रतीक्षाचा 11 विरुद्ध 5 अशा गुणफरकाने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत लक्ष्मीने गदगच्या राधिकाचा 6 विरुद्ध 3 अशा गुणांनी पराभव करून विजेतेपद पटकाविले. तिला मान्यवरांच्या हस्ते गदा, मानाचा किताब, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. लक्ष्मीला डीवायईएस हल्याळचे कुस्ती प्रशिक्षक तुकाराम गौडा यांचे मार्गदर्शन तर वडील संजय पाटील यांचे प्रोत्साहन लाभत आहे. ती शिवाजी महाविद्यालय, हल्याळची विद्यार्थिनी आहे.
Previous Article‘ताज’मधील युएनएससी बैठकीत पाकिस्तानचा पर्दाफाश
Next Article बेळगाव स्पोर्ट्स क्लब, जिमखाना संघ विजयी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.