राष्ट्रीय सहकारी एचएस प्रणॉयकडून पराभवाचा धक्का,
वृत्तसंस्था/ जकार्ता
येथे सुरू असलेल्या इंडोनेशिया खुल्या आंतरराष्ट्रीय पुरुष आणि महिलांच्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत बुधवारी भारताच्या एच. एस. प्रणॉयने आठव्या मानांकित लक्ष्य सेनला पराभवाचा अनपेक्षित धक्का दिला. या विजयामुळे प्रणॉयने तिसऱया फेरीत प्रवेश मिळविला.
पुरुष एकेरीच्या दुसऱया फेरीतील सामन्यात एच. एस. प्रणॉयने लक्ष्य सेनवर 21-10, 21-9 अशा सरळ गेम्समध्ये मात केली. ही लढत 35 मिनिटे चालली होती. लक्ष्य सेन गेल्या काही दिवसांपासून लक्षवेधी फॉर्ममध्ये असून त्याने चालू वषीच्या बॅडमिंटन हंगामात पहिल्यांदा सुपर-500 दर्जाच्या बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते. त्याचप्रमाणे अखिल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत 20 वषीय लक्ष्य सेनने एकेरीची अंतिम फेरी गाठली होती. आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये नवा इतिहास घडवणाऱया थॉमस चषक विजेत्या सांघिक बॅडमिंटन स्पर्धेत एच. एस. प्रणॉयने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. एच. एस. प्रणॉयचा लक्ष्य सेनवरील हा पहिला विजय आहे.
या स्पर्धेतील पुरुष दुहेरीच्या सामन्यात भारताच्या एम. आर. अर्जुन आणि धुव कपिला या जोडीने विजयी सलामी देताना जपानच्या मत्सुई आणि योशिनोरी यांचा 27-25, 18-25, 21-19 अशा गेम्समध्ये पराभव केला. मात्र, महिला दुहेरीत भारताच्या अश्विनी भट आणि शिखा गौतम यांचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले. चीनच्या झियान आणि यु यांनी भट आणि गौतम यांचा 21-9, 21-10 अशा सरळ गेम्समध्ये केवळ 28 मिनिटात पराभव करत पुढील फेरी गाठली. त्याचप्रमाणे महिला दुहेरीतील अन्य एका सामन्यात भारताच्या हरिता हरिनारायण आणि अस्ना नॉय यांना पहिल्याच फेरीत दक्षिण कोरियाच्या इयून आणि जेआँग यांच्याकडून सरळ गेम्समध्ये पराभव पत्करावा लागला.