Tarun Bharat

लक्ष्य सेन मानांकनात सहावा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या नुकत्याच जाहीर झालेल्या पुरुष एकेरीच्या ताज्या मानांकनात भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे. सेनच्या बॅडमिंटन कारकीर्दीतील मानांकनातील ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

पुरुष एकेरीच्या मानांकन यादीत लक्ष्य सेन यापूर्वी आठव्या स्थानावर होता. त्याचे स्थान दोन अंकांनी वधारले आहे. 21 वर्षीय लक्ष्य सेनने 2022 च्या बॅडमिंटन हंगामात 23 स्पर्धांमधून 75,024 मानांकन गुण मिळवले आहेत. या मानांकन यादीत भारताचे किदांबी श्रीकांत आणि एच. एस. प्रणॉय हे अनुक्रमे 11 व्या आणि 12 व्या स्थानावर आहेत.

महिलांच्या दुहेरीच्या मानांकनात भारताच्या ट्रेसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी पहिल्या 20 क्रमांकामध्ये स्थान मिळवले आहे. जॉली आणि गोपीचंद या जोडीने या मानांकन यादीत 19 वे स्थान मिळवले असून त्याचे मानांकन दोन अंकांनी वधारले आहे. ट्रेसा आणि गायत्री या जोडीने बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कास्यपदक मिळवले. 2022 च्या बॅडमिंटन हंगामात 17 स्पर्धांतून या जोडीने 46,020 मानांकन गुण मिळवले आहेत. पुरुष दुहेरीत सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांचे सातवे स्थान कायम राहिले आहे. मिश्र दुहेरीत इशान भटनागर आणि तनीषा क्रेस्टो यांनी 24 वे स्थान घेतले आहे. महिला एकेरीच्या मानांकनात पी. व्ही. सिंधू सहाव्या स्थानावर आहे.

Related Stories

आयसीसीच्या वनडे मानांकनात कोहली, रोहित शर्मा आघाडीवर

Patil_p

जोकोविचची अंतिम फेरीत धडक

Patil_p

राजस्थानचा लखनौवर 3 धावांनी रोमांचक विजय

Patil_p

महेंद्रसिंह धोनीचा ‘किलर’ लूक पाहिला का?

Archana Banage

भारत-विंडीज पहिली टी-20 लढत आज

Patil_p

इटलीची पाओलिनी विजेती

Patil_p