वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने प्रकृती नादुरुस्तीमुळे आगामी होणाऱया ऑस्ट्रेलियन खुल्या सुपर-300 दर्जाच्या पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घेतली आहे.
21 वषीय लक्ष्य सेनला गेल्या काही दिवसांपासून घशामध्ये इन्फेक्शनचा त्रास जाणवत होता. अशा स्थितीत त्याने जर्मनीतील हायलो बॅडमिंटन स्पर्धेत आपला सहभाग दर्शविला होता. पण त्याला या स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला होता. आता सिडनीमध्ये 15 ते 20 नोव्हेंबर दरम्यान होणाऱया ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आपण सहभागी होऊ शकणार नाही, असे कळविले आहे. घशामधील या समस्येमुळे त्याला काही दिवसांपासून अशक्तपणा आणि ताप जाणवतो आहे. त्याच्यावर वैद्यकीय इलाज सुरू असून ही समस्या पूर्ण बरी होईपर्यंत तो विश्रांती घेणार असल्याचे समजते.