पुण्यातल्या लाल महालात काल (ता.20) सिने दिग्दर्शक सुनील बापट आणि नृत्यांगना वैष्णवी पाटील यांनी ‘चंद्रा’ या गाण्यावर रिल्सचं शुटिंग केलं. हा प्रकार समोर येताच संभाजी ब्रिगेड आक्रमक झाला आहे. त्यांनी या दोघांवर कारवाईची मागणी केली आहे. लाल महालात लावणी नृत्य, निषेध.पुण्यातील संभाजी ब्रिगेडचे अविनाश मोहिते यांनी ट्विट करत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पुण्यात मराठा संघ आक्रमक झाला असून, अखिल भारतीय महासंघाकडून लाल महाल शुद्धीकरण करण्याचे काम सुरु आहे.
दरम्यान, संभाजी ब्रिगेडने पोलिस आयुक्तांना तसेच जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे. या प्रकरणी जे कुणी जबाबदार असतील त्यांच्या विरोधात कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. फरासखाना पोलिस ठाण्यात वैष्णवी पाटीलसह चौघांवर गुन्हा नोंद झाला आहे.यानंतर वैष्णवी पाटीलने माफी मागितली आहे.
कोरोनामुळे पर्यटन बंद होते. आता कोरोना कमी झाल्याने अनेक पर्यटक बाहेर पडले आहेत. त्यातच उन्हाळा सुट्टी असल्याने पर्यटनासाठी गर्दी होत आहे. मात्र पुणे महापालिकेने लाल महाल पर्यटकांसाठी बंद ठेवला आहे. दरम्यान रिल्स नृत्यांगना वैष्णवी पाटील ही लाल महालात चंद्रा या गाण्यावर थिरकताना दिसली आहे. हा प्रकार लक्षात येताच सोशल मिडियातून आक्षेप नोंदवला जात आहे. यानंतर संभाजी ब्रिगेड आक्रमक झाले आहेत. त्यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे.
आमचा लावणीला विरोध नाही. मात्र लाल किल्ला हा आमची अस्मिता आहे याठिकाणी जिजाऊंचे स्मारक आहे. असे प्रकार आम्ही खपवून घेतले लाणार नाही असेही मराठा संघाकडून सांगण्यात आले आहे. ज्या ठिकाणी लावणी केली आहे त्य़ाठीकाणी गोमुत्र शिंपडले आहे. तसेच जिजाऊंच्या स्मारकाला दुधाचा अभिषेक घालून शुध्दीकरण करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. आणखीन राजकिय पक्ष या आंदोलनात उतरण्याची शक्यता आहे.
ट्विट करत काय केली मागणी
लालमहालात लावणी नृत्य, निषेध.
लालमहाल आमची अस्मिता आहे. जिजाऊंचे ते स्मारक आहे. याठिकाणी असले धंदे आम्ही खपवून घेणार नाही. तो मस्तानीचा शनिवार वाडा नाही. कृपया यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असे ट्विटमध्ये म्हटले आहे.