Tarun Bharat

लालू यादवांच्या निकटवर्तीयाला अटक

राजदच्या माजी आमदारावर प्राप्तिकरची कारवाई

वृत्तसंस्था/ पाटणा

बिहारच्या पाटणा आणि दरभंगा येथे राजदचे माजी आमदार भोला यादव यांच्या निवासस्थानी छापे टाकण्यात आले आहेत. राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांचे भोला यादव हे निकटवर्तीय आहेत. 26 जुलै रोजी भोला यादव  यांना अटक करण्यात आली आहे.

अटकेच्या कारवाईनंतर पाटणा तसेच दरभंगा येथील निवासस्थानी प्राप्तिकर विभागाने बुधवारी छापे टाकले आहेत. प्राप्तिकर विभागाच्या 7 अधिकाऱयांनी मिळून ही कारवाई केली आहे. भोला यादव हे 2004-09 दरम्यान लालूप्रसाद यादव यांचे ओएसडी (ऑफिसर ऑन स्पेशल डय़ुटी) राहिले आहेत.

भोला यादव हे आयआरसीटीसी आणि रेल्वे भरती घोटाळय़ातील सूत्रधार असल्याचे मानले जात आहे. 2004-09 दरम्यान लालूप्रसाद हे केंद्रीय रेल्वेमंत्री होते. याचदरम्यान रेल्वेमध्ये भरती घोटाळा झाला होता. भोला यादव यांनी या घोटाळय़ात महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप आहे. रेल्वेत भरती करण्याच्या बदल्यात पाटण्यातील अनेक लोकांकडून त्यांनी भूखंड मिळविल्याचा आरोप आहे.

मे महिन्यात सीबीआयने राबडी देवी यांच्या निवासस्थानी छापे टाकले होते. तसशेच 2004-09 दरम्यान रेल्वेमध्ये नोकरी मिळविलेल्या लोकांची सीबीआयने चौकशी केली होती. जमिनीच्या बदल्यात नोकरी देण्यात आल्याप्रकरणी सीबीआयला चौकशीत अनेक पुरावे मिळाले आहेत. या पुराव्यांच्या आधारावरच भोला यादव यांना अटक करण्यात आली आहे.

राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या विरोधात भाजप नेते तसेच बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी आरोप केले होते. लालू यादव यांनी रेल्वेमंत्री असताना नोकरी मिळवून देण्याच्या बदल्यात लोकांकडून भूखंड मिळविल्याचा आरोप मोदी यांनी केला होता. सीबीआयने याप्रकरणी चौकशी केल्यावर अलिकडेच लालू यादव, राबडी देवी, मीसा यादव, हेमा यादव यांच्या विरोधात गुन्हा नोंदविला होता.

Related Stories

राज्यात बाधितांची संख्या दोन हजार पार

Patil_p

व्होडाफोन आयडियातील हिस्सेदारी व्होडाफोनने वाढवली

Patil_p

रालोद प्रमुख जयंत चौधरी जाणार राज्यसभेवर

Amit Kulkarni

विधानसभा पोटनिवडणुकीत 7 पैकी 4 जागा भाजपकडे

Patil_p

प्रजासत्ताक दिन संचलनात 50 विमानांचा सहभाग

Amit Kulkarni

रिझर्व बँकेची ‘ही’ सुविधा 23 मे रोजी काही तासांसाठी राहणार बंद

Archana Banage
error: Content is protected !!