Tarun Bharat

शाश्वत मानकर ठरला ‘राधाकृष्ण श्री 2022’चा मानकरी

प्रणव कांबळी बेस्ट पोझर, मंडणगडच्या मोहसीन सय्यदला उगवता तारा किताब

प्रतिनिधी/ रत्नागिरी

शाश्वत मानकर ‘राधाकृष्ण श्री 2022’ चा विजेता ठरला. तर बेस्ट पोझर प्रणव चंदन कांबळी याचा गौरव करण्यात आला. उगवता तारा पुरस्कार मंडणगड येथील मोहसीन गफार सय्यद याला देण्यात आला.

 रविवारी 14 रोजी राधाकृष्ण वैश्य मंदिर संस्था, रत्नागिरी आणि वैश्य युवा यांच्या वतीने ‘राधाकृष्ण श्री 2022’ जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे राधाकृष्ण मंदिर, रत्नागिरी येथे या स्पर्धेचे आयोजन केले होते. उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन .पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी राधाकृष्ण वैश्य मंदिर संस्थेचे अध्यक्ष राजन मलुष्टे, उपाध्यक्ष विरेंद्र वणजू, सेक्रेटरी मकरंद वणजू, विश्वस्त वसंत भिंगार्डे, राजेश रेडीज, हेमंत वणजू, सदानंद जोशी, सौरभ मलुष्टे आदी उपस्थित होते.

 चार गटात ही स्पर्धा घेण्यात आली. पहिल्या गटात अमर लटके (चिपळूण) याचा प्रथम क्रमांक आला तर ओंकार कांगणे (दापोली) याचा दुसरा, महेश आंबेकर (रत्नागिरी) तृतीय, मोहित गुजर (देवरुख) चौथा आणि राजेंद्र मोदक याचा पाचवा क्रमांक आला. दुसऱया गटात शाश्वत मानकर (रत्नागिरी) प्रथम, हर्षद मांडवकर (राजापूर) दुसरा, वैभव मेस्त्राr (रत्नागिरी) तिसरा, आकाश वाजे (चिपळूण) चौथा आणि रणजित भुवड (चिपळूण) याचा पाचवा क्रमांक आला.

  तिसऱया गटात वैभव देवरुखकर (चिपळूण) पहिला, संजय डेरवणकर (सावर्डे) दुसरा, गणेश गोसावी (सावर्डे) तिसरा, नितेश रसाळ (खेड) चौथा आणि संकेत फागे याचा पाचवा क्रमांक आला. चौथ्या गटात अजिंक्य कदम (राजापूर) प्रथम क्रमांक, स्वप्नील तळेकर (रत्नागिरी) दुसरा, सागर सपटे (मंडणगड) तिसरा, सुदर्शन पाटील चौथा तर सनम इंगावले (खेड) याचा पाचवा क्रमांक आला. शाश्वत मानकर ‘राधाकृष्ण श्री 2022’ किताब विजेता ठरला. बेस्ट पोझर म्हणून प्रणव चंदन कांबळी (रत्नागिरी) आणि उगवता तारा म्हणून मोहसीन गफार सय्यद (न्यू गोल्ड जिम, मंडणगड) यांची निवड करण्यात आली. स्पर्धेच्या बक्षीस वितरणवेळी ‘राधाकृष्ण श्री’ किताब विजेता शाश्वत मानकर याला मानाचा पट्टा व रोख पारितोषिक सुधीर वणजू व अभिज्ञ वणजू यांच्याहस्ते देण्यात आले व आकर्षक शिल्ड ज्येष्ठ उद्योजक प्रवीण मलुष्टे यांच्याहस्ते देण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजन मलुष्टे, उपाध्यक्ष विरेंद्र वणजू, मकरंद खातू, सौरभ मलुष्टे, कुणाल खातू, मुकूल मलुष्टे, सुनील बोडखळे, सचिन केसरकर, मनोहर दळी, गौतम पाष्टे, ऋषी धुंदूर, नरेंद्र वणजू, सदानंद जोशी, शैलेश जाधव, जितेंद्र नाचणकर, पाटील सर, नंदकुमार शिंदे, हेमंत जाधव उपस्थित होते.

Related Stories

जिह्यात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव !

Patil_p

साटेली भेडशीतील दूरसंचार सेवा होणार सुरळीत

NIKHIL_N

कळणेवासियांच्या उपोषणाला राष्ट्रीय काँग्रेसचा पाठिंबा

Anuja Kudatarkar

कोल्हापूर : वाघबीळ घाटात ट्रकचा अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही

Archana Banage

दंड टाळण्यासाठी 95 टक्के दुचाकीस्वारांच्या डोक्यावर ‘हेल्मेट’

Patil_p

वाहनांची कोंडी अखेर दूर

NIKHIL_N