Tarun Bharat

सांत ईनेज येथील लँडमाफिया महम्मद सुहेल सफी गजाआड

जमीन घोटाळय़ातील विक्रांत शेट्टीनंतरची दुसरी अटक

प्रतिनिधी /पणजी

Advertisements

जमीन घोटाळा प्रकरणात एसआयटीने काल बुधवारी मोहम्मद सुहेल सफी (44, रा. सांतईनेज-पणजी) याला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. विक्रांत शेट्टी नंतर ही दुसरी अटक असून जास्तीत जास्त जमिनींची बोगस कागदपत्रे बनवून परप्रांतीयांना विकण्यात आल्याचे समोर येत आहे.

 दरम्यान एसआयटीकडे मनुष्यबळाची कमतरता असल्याची दखल घेऊन सरकारने आणखी 22 जणांना एसआयटीत नियुक्त केले आहे. त्यात 3 पोलीस निरीक्षक, 5 पोलीस उपनिरीक्षक, 2 सहाय्यक उपनिरीक्षक व 12 कॉन्स्टेबल यांचा समावेश आहे.

आसगाव बार्देश येथील जमिनीच्या खरेदी विक्रीत घोटाळा केल्याप्रकरणी मोहम्मद सुहेल सफी याला अटक केली आहे. त्याच्या जबानीतून अधिक तपशील, नावे बाहेर येण्याची शक्यता आहे. सरकारी जमिनींचे देखील हस्तांतरण झाल्याचे समोर आले असून एसआयटीच्या स्थापनेनंतर एकूण 7 तक्रारी एसआयटीकडे दाखल झाल्या आहेत. लोकांनी तक्रारी देण्यास सुरूवात केली असून त्याची चौकशी करण्यात येणार असल्याचे एसआयटीच्या सुत्रांनी सांगितले.

Related Stories

वाघांची नखे गायब प्रकरणाची चौकशी

Patil_p

मडगाव पालिका 25 लाख खर्चून नाले, गटारांची सफाई करणार

Omkar B

अंगणवाडी कर्मचाऱयांच्या अधिकतर मागण्या मान्य

Omkar B

कोरोना बळींचे सत्र सुरुच

Patil_p

दिगंबर कामतविरुद्धची याचिका फेटाळली

Amit Kulkarni

‘मतदार राजा’ आज बजावणार हक्क

Amit Kulkarni
error: Content is protected !!