दि. 12-06-2022 ते 18.6.2022 पर्यंत
मेष
अचानक उद्भवलेल्या परिस्थितीला वेगवेगळय़ा पद्धतीने हाताळावे लागेल. काही अडचण आल्यास वेगळी विचारसरणी वापरून प्रश्न सोडवावा असा टॅरोचा संदेश आहे. हातातील कामे वेळच्यावेळी पूर्ण करावी अन्यथा नुकसान संभवते. जवळच्या व्यक्तींशी वाद होऊ शकतो. स्वतःच्या मताला अवाजवी किंमत देऊ नका. आर्थिक प्रश्न सुटतील.
आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद घालावी
वृषभ
करायला गेलो एक आणि झाले भलतेच अशी साधारण परिस्थिती होऊ शकते. कोणताही निर्णय घेताना ज्ये÷ व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्यावा. कामाच्या ठिकाणी घाईगडबडीमुळे चुका होऊ शकतात. आतापर्यंत वाद झाला नाही अशा व्यक्तीशी वाद संभवतात. नात्यांमध्ये मिठास टिकवण्याकरता प्रयत्न करावे लागतील. आर्थिक आवक चांगली असेल.
पक्ष्यांना दाणे घालावेत
मिथुन
सामाजिक क्षेत्रामध्ये वावर वाढेल. लोकांचे प्रश्न सोडवताना स्वतःकरतासुद्धा वेळ काढावा लागेल. आर्थिक व्यवहारात फसगत होऊ शकते. तुमच्या मनातल्या सुप्त इच्छा पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. नोकरी किंवा व्यवसायामध्ये नवीन प्रोजेक्ट मिळू शकतो. कामाच्या पद्धतीमध्ये थोडा बदल करावा लागेल. प्रेमींनी अपेक्षांना आवर घालावा. नात्यांमध्ये प्रेम वाढेल.
विहिरीमध्ये दोन चमचे दूध टाकावे.
कर्क
हात घालाल तिथे यश मिळू शकते. प्रयत्नांची कास सोडू नये. नवीन सुरुवात दिसेल त्याकरता मानसिक तयारी ठेवावी असा टॅरोचा संदेश आहे. कामांचा उरक वाढवावा लागेल. धावपळ वाढेल. कामाच्या ठिकाणी स्पर्धेला सामोरे जावे लागेल. काही जवळच्या नात्यांमध्ये गैरसमजामुळे दुरावा येऊ शकतो. अति विश्वास घातक ठरेल. आर्थिक अडचणीतून मार्ग निघेल.
कडुलिंबाच्या झाडाला पाणी घालावे
सिंह
काही ठिकाणी वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न असेल पण त्यात तुम्ही यशस्वी व्हालच असे सांगता येणार नाही. वर्तणूक नम्रतेची ठेवण्याचा प्रयत्न करा. आर्थिक बाबतीमध्ये समाधानकारक आठवडा असेल. वैवाहिक जीवनात किरकोळ कारणामुळे ताण तणाव येऊ शकतो. विषम परिस्थितीला योग्य रीतीने हाताळाल. मित्रांचे सहकार्य मोलाचे ठरेल. पित्यासमान व्यक्तीचा सल्ला घ्यावा. मुंग्यांना साखर घालावी
कन्या
कामांच्या बाबतीमध्ये गोंधळ उडेल. कोणते काम पहिल्यांदा पूर्ण करावे हे कळणार नाही. त्यामुळे नियोजनबद्ध पद्धतीने काम करणे आवश्यक आहे. या आठवडय़ात एकटेपणा जाणवू शकतो. तुमचा मुद्दा बरोबर असूनसुद्धा काही ठिकाणी माघार घ्यावी लागू शकते. नात्यांमध्ये तडजोडीची भूमिका घ्यावी. वाद टळतील. आर्थिक आवक थोडी मंदावू शकते पण पुढे येणारा काळ हा उत्तम असेल.
पांढऱया रंगाचा धागा गळय़ात बांधावा
तूळ
हरप्रकारे सावध राहणे गरजेचे असेल. जवळचे मित्र किंवा नातेवाईक दगा देऊ शकतात. आर्थिक बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारे व्यवहार करत असताना लेखी करार केल्याशिवाय करू नका. तब्येतीची, विशेषतः हाडांची काळजी घेणे आवश्यक ठरेल. व्यावसायिक निर्णय यशस्वी ठरतील. प्रेम प्रसंगांमध्ये आनंद असेल. स्वतःकरता वेळ काढावा असे वाटेल. दूरच्या ठिकाणाला भेट द्याल.
हिना अत्तर लावावे
वृश्चिक
वेळेचे भान ठेवणे गरजेचे असेल. त्यामुळे कामे पूर्ण होतील. एखाद्या जुन्या आजारातून मुक्तता मिळू शकते. घरी पाहुण्यांचे आगमन होईल. त्यांच्यासोबत मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठी खर्च कराल. अचानक घडलेल्या काही घटनांमुळे व्यावसायिक संबंधांमध्ये दुरावा येऊ शकतो आणि त्यामुळे नुकसान संभवते. भागीदारीत व्यवसाय असेल तर वाद-विवादांपासून दूर रहा. प्रेमींनी भावनांची कदर करावी.
लाजाळूचे झाड घरी लावावे.
धनु
तुम्ही केलेल्या कामाची प्रशंसा होईल. कामाच्या ठिकाणी नव्या संधी मिळतील. ओळखीमुळे आर्थिक लाभ संभवतो. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदाराच्या भावना समजून घ्याव्या लागतील. कौटुंबिक जबाबदारीमध्ये वाढ होईल. अनाठाई खर्च होऊ शकतो. एखाद्या समारंभाचे आमंत्रण मिळेल. विद्युत उपकरणे हाताळताना किंवा गाडी चालवताना सावध राहणे आवश्यक आहे.
मोहरीचे तेल लावलेली चपाती कुत्र्याला खाऊ घालावी
मकर
हा आठवडा तुम्ही कामाच्या व्यापामुळे व्यस्त असाल. व्यावसायिक जबाबदारी निभावताना वेळ पुरणार नाही. दिलेला शब्द पाळावा लागेल त्यामुळे वचन देताना विचारपूर्वक द्या. ओळखीमुळे नवीन कामे मिळू शकतात. कौटुंबिक वातावरण समाधानकारक असेल. प्रेमींनी जबाबदारीची जाणीव ठेवावी. वैवाहिक जोडीदाराला पुरेसा वेळ देणे गरजेचे असेल.
पिंपळाच्या झाडाला हिरवे सुत बांधावे.
कुंभ
नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल आणि यामुळे पुढे जाऊन फायदा होईल. या आठवडय़ात आळस झटकून कामाला लागणे गरजेचे आहे. मनाप्रमाणे काम होण्याकरता दुसऱयाची मदत घ्यावी लागेल आणि त्यात काहीही गैर नसेल. सहकाऱयांशी आदराने व्यवहार करा. मित्रांचे सहकार्य मोलाचे ठरेल. तुमच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी वेळेचा सदुपयोग करा.
कुंभाराच्या चाकावरची माती घरी ठेवावी
मीन
या आठवडय़ामध्ये तुम्हाला तुमच्या जवळच्या लोकांच्या मदतीची आवश्यकता असेल. कामाच्या ठिकाणी अचानक कामाचा दबाव वाढू शकतो. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना किंवा नवीन व्यवसाय सुरु करण्याची इच्छा असलेल्यांना उत्तम संधी प्राप्त होऊ शकते. मित्र-मैत्रिणींबरोबर जास्त वेळ काढणे महागात पडू शकते. कौटुंबिक गरजांकडे लक्ष देणे भाग पडेल.
आपले जुने वस्त्र गरजूला द्यावे
टॅरो उपाय होणारी कामे होत नाहीत, नवीन कामांमध्ये अडचणी येतात अशा बाधेकरता एका मातीच्या भांडय़ात शुद्ध मध भरून ते भांडे विराण जागेला ठेवून यावे. हे करताना कोणासही कळू देऊ नये.