पाण्याचे मार्ग अन् रंगबिरंगी भूमी
चीनमधील शुइशियांग किंवा जियांगसु प्रांत त्याच्या सौंदर्यामुळे जगभरात प्रसिद्ध आहे. या भागाला लँड ऑफ वॉटर या नावानेही ओळखले जाते. कालवा, सुपीक जमीन आणि नद्यांच्या त्रिभुज प्रदेशामुळे येथे पाण्याचे प्रमाण मोठे आहे.
येथे यांगत्झे नदी वाहते आणि याला आशियातील सर्वात मोठी नदी मानले जाते. ही नदी क्विघाईपासून पूर्व चीन महासागरापर्यंत 4 हजार मैलापर्यंत वाहते. या नदीमुळेच जियांगशू प्रांत जलसमृद्ध झाला आहे.
सुजोऊ शहरापासून आणखी अनेक अशी गावे आहेत, ज्यांच्यादरम्यान मार्गांप्रमाणे होत नदी वाहते आणि याला ठिकाणाला असाधारण सौंदर्य प्राप्त करून देते. या प्रांताला पूर्वेकडील व्हेनिसही म्हटले जाते. जियांगशू प्रांतात 1000 मैलापर्यंत ही नदी वाहते, याला ग्रँड कॅनॉल म्हटले जाते. हाच जलमार्ग या भागाला आर्थिकदृष्टय़ा अत्यंत समृद्ध करतो.
सुजोऊ, यांगजोऊ आणि अनेक ठिकाणे सध्या पर्यटनकेंद्रे ठरली आहेत. 281-618 या काळात सुंग वंशादरम्यान हे कालवे तयार करण्यात आले होते असे सांगण्यात येते. या कालव्यांद्वारे यांगत्झे नदीच्या मुखापर्यंत अन्नधान्य पोहोचविले जात होते. अत्यंत प्राचीन व्यापारी मार्ग आजही सुजोऊमध्ये सुरु आहे.
याचबरोबर मिंग युगमध्ये निर्मित बाओदई ब्रिजवरही ऐतिहासिक व्यापारी मार्ग सुरू आहे. जियांगसु शहर केवळ पाण्याचे शहर नव्हे तर फुलांचे नंदनवन म्हणूनही ओळखले जाते. येथे एखाद्या रांगोळीप्रमाणे फुलांची शेती केली जाते. येथील काही गावांची सैर आजही नौकांद्वारे केली जाते. लोक मासेमारी पकडण्यासाठी सरोवरांमध्ये उतरतात. जुनी घरे पाहणे आणि नौकेद्वारे प्रवास करण्याचा अनुभव खरोखरच विलक्षण असतो. विशेषकरून तोंगली शहराचे सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक नौकेचा पर्याय निवडत असतात.