वृत्तसंस्था / लखनौ
दिल्लीहून झारखंडमधील देवघर येथे जाणाऱया इंडिगोच्या 6-ई-6191 या फ्लाईटमध्ये सोमवारी बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाली. यानंतर सदर विमान लखनौकडे वळवण्यात आले. आपत्कालीन स्थितीत विमानाचे यशस्वी लॅण्डिंग करण्यात आले. त्यानंतर सर्व प्रवाशांना उतरवून विमानाची कसून तपासणी करण्यात आली. तपासादरम्यान विमानात बॉम्ब सापडला नाही. या सर्व घटनेदरम्यान सुरक्षा नियमांचे पूर्णपणे पालन करण्यात आल्याचे इंडिगो व्यवस्थापनाने सांगितले. तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा बॉम्ब न सापडल्याने विमानाचे पुढील मार्गावर टेकऑफ करण्यात आले.