Tarun Bharat

कोलंबियात भूस्खलन, 38 जणांचा मृत्यू

8 मुलांचा समावेश ः  8 वर्षीय मुलीला वाचविण्यास यश

वृत्तसंस्था/ बोगोटा

दक्षिण अमेरिका खंडातील देश कोलंबियामध्ये सोमवारी मोठी दुर्घटना घडली आहे. कोलंबियातील रिसाराल्डा प्रांतात एक बस भूस्खलनाच्या तावडीत सापडली आहे. या दुर्घटनेत 34 जणांना जीव गमवावा लागला आहे. नॅशनल युनिट फॉर डिझास्टर रिस्क मॅनेजमेंटनुसार मृतांमध्ये 8 मुलांचा समावेश आहे. तर अनेक जण अद्याप ढिगाऱयाखाली अडकून पडलेले असल्याने बचावकार्य सुरूच आहे.

मुसळधार पावसानंतर रिसाराल्डा प्रांतात भूस्खलन झाले आहे. बससह काही अन्य वाहने देखील ढिगाऱयाखाली सापडली आहेत. कैली शहरातून चोको प्रांतातील कोंडोटो शहराच्या दिशेने ही बस प्रवास करत होती. प्यूब्लो रिको आणि सांता सेसिलियादरम्यान ही दुर्घटना घडली आहे.

भूस्खलनानंतर ढिगाऱयाखाली प्रथम एक कार सापडली, मग मार्ग बंद झाला. मागून येणारी वाहने थांबली, दुर्घटनेनंतर एक जीप, बस आणि दुचाकी थांबलेली असताना अचानक पुन्हा भूस्खलन झाले, माती अन् दगडांचा ढिगारा वेगाने खाली आल्याने कुणालाच हलता आले नसल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

या संकटसमयी पीडित कुटुंबांसोबत सरकार उभे असल्याचे उद्गार कोलंबियाचे अध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी काढले आहेत. सध्या 9 जणांना वाचविण्यास यश आले आहे. यात एका 7 वर्षीय मुलीला ढिगाऱयाखालून जिवंत बाहेर काढण्यात आले आहे, परंतु दुर्घटनेत तिच्या आईचा मृत्यू झाला असल्याचे बचाव पथकातील अधिकाऱयाने सांगितले आहे.

Related Stories

तुर्कस्तानात संकट वाढले

Patil_p

इंडोनेशियात ज्वालामुखी जागृत

Patil_p

जगातील सर्वात उंच कुटुंब अमेरिकेत

Patil_p

नेपाळ विमान दुर्घटनेतील सर्व 22 मृतदेह सापडले

Patil_p

फ्रान्समध्ये दोन विमानांची हवेत धडक; 5 जणांचा मृत्यू

datta jadhav

बांगलादेशात होते तरंगती शेती

Patil_p