Tarun Bharat

भाषा ही संवाद साधण्याचे महत्त्वाचे माध्यम

Advertisements

प्रा. डॉ. जे. माधवी यांचे प्रतिपादन : आरसीयू इंग्रजी विभागातर्फे व्याख्यान

प्रतिनिधी /बेळगाव

भाषा ही संवाद साधण्याचे महत्त्वाचे माध्यम आहे. इंग्रजी ही जागतिक भाषा असल्याने दैनंदिन जीवनात सर्वत्र तिचा वापर होत आहे. भाषेचा वापर संवाद कौशल्य, वाक्यांची योग्य जुळणी करण्यासाठी होतो. इंग्रजीवर प्रभुत्व मिळविण्यासाठी नियमित वाचनासह शब्दांचा उच्चार योग्यप्रकारे करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ओस्मानिया युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजीच्या प्रा. डॉ. जे. माधवी यांनी केले.

राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या इंग्रजी विभागातर्फे स्पर्धात्मक परीक्षेसाठी इंग्रजी या विषयावर प्रा. डॉ. जे. माधवी यांचे गुरुवारी व्याख्यान झाले. त्यांनी स्पर्धात्मक युगात इंग्रजी भाषेचे महत्त्व याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. अध्यक्षस्थानी आरसीयूच्या इंग्रजी विभागप्रमुख प्रा. डॉ. नागरत्ना व्ही. परांडे होत्या. यावेळी प्रा. विजय नागन्नावर, प्रा. डॉ. कविता कुसुगल, प्रा. डॉ. पूजा हल्याळ आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन समन्वयिका प्रा. डॉ. मधुश्री कल्लीमनी यांनी केले.

स्वागतगीत सदानंद ढवळेश्वर याने म्हटले. स्वागत पुष्पा वड्डर हिने केले. पाहुण्यांची ओळख प्रवीण मुधोळ याने करून दिली. सूत्रसंचालन विनायक नंदी याने केले. सोनाली कल्लोळी हिने आभार मानले.

Related Stories

बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ात सीईटीला प्रारंभ

Tousif Mujawar

मराठीच्या डिजिटल माध्यमाला स्वीकारा

Patil_p

गुऱहाळघरांना शासनाने अनुदान उपलब्ध करून द्यावे

Omkar B

मच्छेतील मराठी-कन्नड शाळांना हेस्कॉमची नोटीस

Amit Kulkarni

कौशल्य विकास योजना अपयशी

Amit Kulkarni

करंबळ हायस्कूलचे क्रीडास्पर्धेत यश

Amit Kulkarni
error: Content is protected !!