वृत्तसंस्था/ कोलंबो
लंकन क्रिकेट संघ भारताच्या दौऱयावर तीन वनडे आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. सदर मालिका 3 ते 15 जानेवारी दरम्यान खेळवल्या जाणार आहेत. या मालिकांसाठी लंकन क्रिकेट संघाने भारताकडे प्रयाण केले आहे. लंकन संघाचे नेतृत्व दसून शनाकाकडे सोपविण्यात आले आहे. या दौऱयासाठी क्रिकेट लंकेने 20 सदस्यांचा संघ निवडला आहे.
भारत आणि लंका यांच्यातील पहिला टी-20 सामना मंगळवार 3 जानेवारीला मुंबईत होत आहे. त्यानंतर या मालिकेतील दुसरा सामना 5 जानेवारीला पुणे तर तिसरा सामना 7 जानेवारीला गौहत्तीमध्ये खेळविला जाईल. टी-20 मालिकेनंतर लंकन संघ भारताबरोबर तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 10 जानेवारी गौहत्तीमध्ये, दुसरा सामना 12 जानेवारीला कोलकाता आणि तिसरा वनडे सामना 15 जानेवारीला त्रिवेंद्रम येथे खेळविला जाईल. या दोन्ही मालिकांसाठी भारतीय संघाचे नेतृत्व हार्दिक पांडय़ा आणि रोहित शर्मा यांच्याकडे सोपविले आहे. भारताच्या टी-20 संघाचे नेतृत्व हार्दिक पांडय़ा तर वनडे संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे.
लंकन संघ- देसून शनाका (कर्णधार), पी. निशांका, अविष्का फर्नांडो, एस. समरविक्रमा, कुशल मेंडीस, भानुका राजपक्षे, चरिथ असालंका, धनंजय डिसिल्वा, हसरंगा, ए. बंदारा, महेश तीक्षणा, जे. व्हँडेरेसी, चमिका करुणारत्ने, दिलशान मधुशनका, कसून रजिता, एन. फर्नांडो, विलालगे, प्रमोद मधुशेन, एल. कुमारा आणि एन. तुषारा.
भारत टी-20 संघ – हार्दिक पंडय़ा (कर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी आणि मुकेश कुमार.
भारत वनडे संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल, इशान किशन, हार्दिक पंडय़ा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहमद शमी, मोहमद सिराज, उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग.