Tarun Bharat

मागिलवर्षी भारतात दररोज सरासरी 86 बलात्कार…दर तासाला 49 महिलांवर गुन्हे दाखल

ऑनलाईन टिम / नवी दिल्ली

भारतात मागिलवर्षी म्हणजे 2021 सालामध्ये देशभरात बलात्काराची एकूण 31,677 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. या गुन्ह्यांची सरासरी 86 बलात्कार प्रतिदिन इतकी नोंद झाली आहे. दर तासाला महिलांवरील गुन्ह्यांची सुमारे 49 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. ही आकडेवरी ताज्या सरकारी अहवालानुसार समोरआली आहे.
तर 2019 मध्ये भारतात बलात्काराच्या घटनांचा आकडा 32,033 होता. तर 2020 मध्ये या घटनांची संख्या 28,046 झाली. असे नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या ‘क्राइम इन इंडिया 2021’ अहवालात दिसून आले आहे. NCRB गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते.

या यादीत राज्यांमध्ये राजस्थान (6,337) या आकड्यांसह पहिल्या क्रमांकावर आहे, त्यानंतर मध्य प्रदेश (2,947), महाराष्ट्र (2,496) आणि उत्तर प्रदेश (2,845) असा नंबर लागतो. राजधानी दिल्लीमध्ये 2021 मध्ये 1,250 बलात्काराच्या घटनांची नोंद झाली आहे.

NCRB नुसार अखिल भारतीय घटनांचा सरासरी दर 4.8 प्रतिलाख आहे. प्रति एक लाख लोकसंख्येमध्ये बलात्काराच्या गुन्ह्याचे प्रमाण राजस्थानमध्ये (16.4) इतके सर्वाधिक आहे. त्यानंतर चंदीगड (13.3), दिल्ली (12.9), हरियाणा (12.3) आणि अरुणाचल प्रदेश (11.1) असा क्रम लागतो. 2021 मध्ये देशभरात एकूण 4,28,278 ‘महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांचे’ गुन्हे दाखल करण्यात आले असून, गुन्ह्यांचा दर (प्रति लाख लोकसंख्येनुसार) 64.5 आहे. अशा गुन्ह्यांमध्ये आरोपपत्र दाखल होण्याचे प्रमाण ७७.१ होते, असे अधिकृत आकडेवारीवरून दिसून आले आहे.

Related Stories

Kolhapur; कोल्हापुरात मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यात वातावरण तापलं; शिवसैनिकांची पोलिसांकडून धरपकड

Abhijeet Khandekar

बाबासाहेबांच्या पुतळय़ाची उंची वाढणार

datta jadhav

युरिया खताच्या दुष्काळाने शेतकरी हतबल

Archana Banage

भारतात कोरोनाबाधितांनी ओलांडला 10 लाखाचा टप्पा

datta jadhav

बनावट औषधांसंबंधी दक्षतेचा इशारा

Patil_p

सांगली : एका उपनिरीक्षकासह दोन पोलिसांना कोरोनाची लागण

Archana Banage