प्रतिनिधी / बेळगाव
नार्वेकर गल्ली, शहापूर येथील लाटुकर बंधूंची सासनकाठी बुधवार दि. 13 रोजी जोतिबा डोंगराला रवाना झाली. सकाळी देवाला अभिषेक घालून झाल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवून आरती करण्यात आली. ढोल व ताशांच्या गजरात गल्लीतील पंच मंडळी, भाविक भक्तजण कोल्हापूर येथील वाडीरत्नागिरी चैत्रवारी करून आल्यानंतर रविवार दि. 24 रोजी सकाळी अभिषेक व गुलाल उधळण करण्यात येणार आहे. यानंतर देवाला नैवेद्य दाखवून महाप्रसादाचे वाटप झाल्यानंतर जोतिबा भंडाऱयाची सांगता होईल. याचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा, असे पुजारी आदिनाथ लाटुकर यांनी कळविले आहे.