Tarun Bharat

तब्बल १२ वर्षानंतर सराईत गुन्हेगारास लागणार मोक्का

Advertisements


लातूर : चाकूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम व त्यांचे सहकारी तपास पथकाला तब्बल १२ वर्षानंतर लातूर जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांच्या टोळीच्या विरोधात मोक्का गुन्ह्याला अप्पर पोलीस महासंचालकांनी मंजुरी दिली आहे. मार्च 2022 रोजी पोलीस ठाणे चाकूर येथे चापोली शिवारातील दाखल असलेल्या खून व खुनाचा कट करणार्‍या तसेच अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आंतरजिल्हा टोळीविरुद्ध मोका कायद्याप्रमाणे दोषारोपपत्र पाठवण्यास अपर पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य कायदा व सुव्यवस्था यांचेकडून अंतिम मंजुरी मिळाली असून पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांचे मार्गदर्शनात तपासी अधिकारी चाकूर उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक . निकेतन कदम व त्यांच्या टीमच्या सखोल व कसोशीने केलेल्या तपासाला यश आले आहे.

चाकूर पोलीस ठाण्याचे पो.नि. बालाजी मोहिते व पोलीस अंमलदार यांनी तपास करून गुन्ह्यातील मुख्य आरोपी व सूत्रधार असलेला नारायण तुकाराम इरबतनवाड (वय 45 वर्ष, राहणार शिरूर ताजबंद, तालुका अहमदपूर जिल्हा लातूर) यांच्यासह इतर 11 ज्यामध्ये 10 आरोपी आणि 1 विधी संघर्ष बालक निष्पन्न केले. सर्व आरोपींनी सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले.

आरोपींना कोर्ट मंजुरीने अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्याबाबत सखोल तपास केला असता असे निदर्शनास आले की, नमूद गुन्ह्यातील आरोपी टोळी करून टोळीने गुन्हे करणारे तरबेज व सराईत धाडसी व कुख्यात व सक्रिय गुन्हेगार असून त्यांनी लातूर जिल्ह्यातील पोलीस ठाणे गांधीचौक, पोलीस ठाणे अहमदपूर व चाकूर तसेच नांदेड जिल्ह्यातील पोलीस ठाणे मुखेड हद्दीत स्वतःच्या आर्थिक लाभासाठी, संघटितपणे, वेगवेगळे साथीदार घेऊन टोळी निर्माण करूनहिंसाचाराचा वापर व कट करून जीवे मारणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर जमाव जमवून घातक हत्याराने दुखापतकरणे, अवैधपणे अफूची तस्करी करणे यासारखे गंभीर गुन्हे करून दहशत निर्माण करून अवैध सावकारीच्या माध्यमातून स्वतःचे व टोळीतील साथीदाराचे आर्थिक फायदा करिता गुन्हे करतात. तसेच सर्वसामान्य जनतेमध्ये दहशत निर्माण करून लोकांच्या जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण करणे, स्वतःचा व सोबतच्या साथीदारांचा आर्थिक फायदा करण्यासाठी स्वतःला भाई, दादा सिद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. असे निष्पन्न झालेने संघटित गुन्हे करणार्‍यासदर आरोपीच्या टोळी विरुद्ध पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोली यांच्याकडे मोक्का कायद्यान्वये वाढीव कलमेलावण्याबाबत प्रस्ताव पोलीस अधीक्षकांच्या मार्फत पाठवून त्यास मोक्का लावण्याची पूर्वपरवानगी प्राप्त झाल्यानंतर पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम हे करीत होते.

त्यानुसार अपर पोलीसमहासंचालक कुलवंत कुमार सारंगल यांनी सराईत आरोपी नारायण तुकाराम इरबतनवाड, (वय 45 वर्ष , राहणार शिरूर ताजबंद, तालुका अहमदपूर) यांच्यासह इतर आरोपी विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 (चउजउ-) च्या कलम 3(1)(ळ), 3(2), 3(3), 3(4) प्रमाणे दोषारोप पाठविणेस मंजुरी दिली आहे. सदर गुन्ह्यांमध्ये मोक्का प्रमाणेतपास व दोषारोप पाठवण्यास मंजुरी मिळवण्याकरिता नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक निसार तांबोली, लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, यांचे मार्गदर्शनात तपास अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम व त्यांच्या पथकातील पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच विधी सल्लागार सारिका वायबसे यांनी मोक्का कायद्यान्वये दोषारोप पाठविण्यास मंजुरी करता व परिपूर्ण तपासा करता परिश्रम व सहभाग घेऊन उल्लेखनीय कामगिरी केली.

Related Stories

राज्यातील साडेतीन लाख चतुर्थश्रेणी कर्मचारी संपावर जाणार

Abhijeet Shinde

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात कोरोनाचे दोन बळी

Abhijeet Shinde

‘त्या’ तरुणाचा खून अवघ्या साडेचारशे रुपयांसाठी

Abhijeet Shinde

“मोदी सरकारच्या बेजबाबदारपणामुळेच कोरोना दुसऱ्या लाटेत…” – सोनिया गांधी

Abhijeet Shinde

…तर शाहरुखने आर्यनला पुनर्वसन केंद्रात ठेवावे

datta jadhav

निवेदने, तक्रारी करुनही लक्ष्मी टेकडीवर अवैध व्यवसायिकांचा सुळसुळाट

Patil_p
error: Content is protected !!