सकारात्मकता अन् आत्मविश्वासा पडते भर : 30 टक्के लोक दररोज केवळ 20 वेळा हसतात
चेहऱयावर हास्य आवश्यक असून यामुळे मूड चांगला करण्यास मदत होत असते. तसेच चिंता आणि नैराश्य कमी होते. जेव्हा तुम्ही निराश असाल तेव्हा चेहऱयावर किंचित हास्यही सकारात्मक विचारांचा संचार घडवून आणू शकते. प्रत्यक्षात हास्याचा शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी थेट संबंध आहे.
अलिकडेच झालेल्या एका संशोधनात हास्यामुळे आत्मविश्वास वाढण्यासह लोक आकर्षक दिसू लागत असल्याचे आढळून आले ओ. हास्य मेंदूच्या अशा हिस्स्याला ट्रिगर करतो, जो तुमच्या भावनांना नियंत्रित करत असतो. जगात सरासरी 30 टक्क्यांपेक्षा अधिक लोक दिवसात 20 हून अधिक वेळा हसत असतात असे मानले जाते.
हास्यामागे दातांची भूमिका
फोर्ब्सनुसार चांगल्या हास्यामागे दातांची भूमिका अत्यंत मोठी असते. सरळ दात असलेल्या लोकांना अधिक विश्वासू, आत्मविश्वासी मानले जाते. जर दात वेडेवाकडे असतील तर त्याच्या हास्याचा प्रभाव कमी होतो. हास्यामुळे सौंदर्य दिसून येते असे लोकांचे मानणे असते. एका व्यक्तीचे हास्य त्याची स्वप्रतिमा, आत्मविश्वास आणि प्रत्यक्षात शारीरिक आणि मानसिक आरोग्यात मोठी भूमिका बजावत असल्याचे डेंटिस्ट सॅम जेठवा यांचे म्हणणे आहे. तुटलेले दात किंवा हिरडय़ा सुजलेल्या असल्यास हास्य प्रभावित होते. 40 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांमध्ये ही समस्या अधिक असते असे जेठवा यांनी म्हटले आहे.
मुलांमध्ये हास्य अधिक
18 वर्षांपर्यंतची मुले दिवसाला सरासरी 400 हून अधिक वेळा हसत असतात. यातील निम्म्याहून अधिक वेळा खळखळून हसणे सामील आहे. वय वाढण्यासह लोकांचे हसणेही कमी होत जात असल्याचे संशोधकांना आढळून आले आहे.