50 मिनिटात चार्ज होणार 80 टक्के बॅटरी ः 50,000 मध्ये करता येणार बुकिंग
नवी दिल्ली
चीनी ऑटो कंपनी बीवायडी (बिल्ड युवर ड्रीम) कडून भारतात आपले इलेक्ट्रिक वाहन एटो 3 सादर करण्यात आले आहे. जवळपास 50 हजार रुपये किंमत असलेल्या या प्रवासी वाहन एसयूव्हीचे बुकिंग आधीच सुरू झाले आहे. कारची किंमत नोव्हेंबरमध्ये जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आहे. याच दरम्यान, कारच्या निवडक 500 युनिट्सची डिलिव्हरी जानेवारी 2023 पासून सुरू होईल. कार चेन्नईमध्ये असेंबल करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
कंपनीचा दावा आहे, की कारची बॅटरी 50 मिनिटांत 0 ते 80 टक्केपर्यंत चार्ज होईल. कार 7.3 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेगाने धावणार आहे.
521 किमीचे मायलेज
कमाल 200 एचपी पॉवर आणि 310 एनएम पीक टॉर्क जनरेट करणाऱया कारमध्ये 3 ड्रायव्हिंग मोड उपलब्ध आहेत, इको, नॉर्मल आणि स्पोर्ट. 60.48 केडब्लूएच क्षमतेच्या बॅटरी क्षमतेसह या वाहनाची राइड रेंज 521 किमी असल्याचा दावा करण्यात आला आहे. मायलेज हे भक्कमा असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
12.8 इंच इन्फोटेनमेंट सिस्टम
आतील भागात 12.8 इंच इंफोटेनमेंट सिस्टम, अल्ट्रा सेफ ब्लेड बॅटरी आणि 8 स्पीकर ऑडिओ सिस्टम मिळेल. सुरक्षेसाठी 7 एअर बॅग आहेत.