बेळगाव ः
190 वर्षांची वैभवशाली परंपरा लाभलेल्या मे. पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ पेढीने गुंजन (पैंजण) महोत्सव आयोजित केला आहे.
या महोत्सवाचा शुभारंभ शैला कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. शाखाप्रमुख प्रीतपाल भल्ला, रेखा जोगळेकर, चांदी विभागप्रमुख पुंडलिक पुजारी व सर्व स्टाफने नेटके संयोजन केले.
गुंजन (पैंजण) महोत्सवांतर्गत पैंजण खरेदीच्या मजुरीवर 100 टक्के सवलत मिळणार आहे. पैंजण महोत्सवाच्यानिमित्ताने पारंपरिक तसेच आधुनिक पैंजणाबरोबर अँटीक प्रकारची पैंजणे उपलब्ध आहेत. याचबरोबर रुपाली पैंजण, गजेश्री पैंजण, बाजरा पैंजण, लाईट वेट सेलम, अयोध्या, लहान मुलांचे लाईट वेट बॉम्बे पायल, आग्रा, चाळ, इटालियन पट्टा, वजनाला हलकी ट्रेंडी पैंजणे आदी प्रकार या महोत्सवात असंख्य व्हरायटीमध्ये ग्राहकांना आकर्षित करतील, असा विश्वास संचालकांतर्फे व्यक्त करण्यात आला. तसेच पीएनजीच्या महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्व शाखांमध्ये हा गुंजन उपक्रम सुरू असणार आहे, त्याचा ग्राहकांनी लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.