येळ्ळूरमध्ये लावली 317 रोपे, आर्ष विद्या केंद्रातील मुलींना राखी तयार करण्याचे प्रशिक्षण
प्रतिनिधी/ बेळगाव
इनरव्हील क्लब ऑफ बेळगावच्या नूतन अध्यक्षा शालिनी चौगुले, सचिव पुष्पांजली मुक्कण्णावर यांनी आपल्या उपक्रमाचा शुभारंभ करताना येळ्ळूर गावामध्ये 317 रोपे लावली. तसेच डॉक्टर्स डे निमित्त पशुवैद्यकीय डॉ. कासार यांचा सत्कार केला.
त्याचप्रमाणे क्लबतर्फे वर्षभर चालणाऱया स्वस्थम या उपक्रमाचा शुभारंभ आयएमएच्या अध्यक्षा डॉ. राजश्री अनगोळ यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रकल्पाच्या प्रमुख स्वाती उपाध्य असून अपर्णा भटकळ यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. या अंतर्गत 130 विद्यार्थिनींची तपासणी करण्यात आली. स्वस्थम अंतर्गत विद्यार्थिनांची दंत, नेत्र, हाडांची ठिसुळता तसेच रक्तक्षय आदींची तपासणी करण्यात येणार आहे. विविध शाळांमध्ये काम करणाऱया चतुर्थश्रेणी कर्मचाऱयांचा आणि अन्य कर्मचाऱयांसाठी शुक्रीया हा कार्यक्रम घेण्यात आला.
या अंतर्गत 8 शाळांचा सत्कार करण्यात आला. कीर्ती टेंबे व स्वाती गिंडी यांनी त्यांच्यासाठी खेळ घेतले. अमृता जैन आणि मनवा हुन्सवाडकर यांनी याचे संचालन केले. संध्याकाळी आर्ष विद्या केंद्रातील मुलींना राखी तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या राख्या जवानांना पाठवून देण्यात येणार आहेत. येथील मुलींचीही आरोग्य तपासणी करण्यात आली. वीणा शहा, सुनीता हणमशेट व स्वाती उपाध्य यांनी यासाठी पुढाकार घेतला.