Launch of “Love Malvan” Selfie Point
मालवण हे पर्यटन शहर आहे आणि पर्यटन दृष्ट्या या शहराचा विकास करत असताना शहर सुशोभीकरण करण्याच्या उद्देशाने मालवण शहरात विविध ठिकाणी सुशोभीकरण साठी निधी मिळावा यासाठी आमदार वैभव नाईक यांच्या कडे मागणी केली होती. त्यानुसार आमदार साहेब यांनी पाठपुरावा करून वेळोवेळी निधी उपलब्ध करून दिला आहे. समुद्राच्या काठावर असणार मालवण नप चे रॉक गार्डन हे पर्यटकांच्या पसंतीचे पर्यटन स्थळ बनले आहे. डेकोरेटिव्ही लाईट, म्युझिकल फाऊटन यामुळे लाखो पर्यटक या ठिकाणी भेट देतात. फोटोग्राफी चा आनंद घेतात. या पर्यटकाना मालवण कायम स्मरणात राहावे या उद्देशाने या ठिकाणी आय लव्ह मालवण हा सेल्फी पॉईंट होण्याच्या दृष्टीने सन 2020/21 ला रुपये 8 लाख जिल्हा पर्यटन निधीची मागणी करण्यात आली होती आणि यास 31 मार्च 2021 रोजी प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली होती. यासाठी आमदार वैभव नाईक यांनीही पाठपुरावा करून हा निधी उपलब्ध करून दिला होता. त्या नुसार प्रत्यक्ष कामास सुरुवात होऊन आता ते पूर्णत्वास आलेले आहे. आणि यामूळे मालवण च्या पर्यटन सौदर्यात भर पडलेले आहे. पर्यटकानी या ठिकाणी सेल्फी काढल्याने मालवण शहर त्यांच्या कायम स्मरणात राहणार आहे. पर्यायाने मालवण मालवण शहराचा पर्यटन दृष्ट्या प्रचार होण्यास मदत होणार आहे. या कामाचा लोकार्पण सोहळा आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते लवकरच करण्यात आले. माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी श्रीफळ वाढविले.