प्रतिनिधी/ बेळगाव
रस्ता सुरक्षा व ट्रफिक जागृती यासाठी रोटरी क्लब ऑफ बेळगावने वाहनचालकांसाठी ‘वाईज रायडर’ प्रकल्प हाती घेतला आहे. वाहनचालकांना वाहतुकीचे नियम व सुरक्षा याबद्दल प्रकल्पातून माहिती दिली जाणार आहे. रोटरीचे प्रांतपाल व्यंकटेश देशपांडे यांच्या हस्ते वाईज रायडर उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
याबाबत रोटरी क्लब त्याचबरोबर रोटॅक्ट क्लबच्या माध्यमातून जागृती केली जाणार आहे. व्याख्याने, प्रश्नमंजुषा, व्यंगचित्रे, रस्ता सुरक्षा स्टीकर्स, शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रबोधन केले जाणार आहे. पहिल्या वेळी ज्या प्रकारे नागरिकांनी प्रतिसाद दिला, त्याचप्रकारे या वेळेसही प्रतिसाद द्यावा, असे आवाहन रोटरीतर्फे करण्यात आले.
2015-16 या वर्षात हा प्रकल्प राबविण्यात आला होता. त्याला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. यावेळी रोट्रक्ट क्लबचे सदस्य अनिकेत जाधव, माजी अध्यक्ष संजय कुलकर्णी यासह इतर मान्यवर उपस्थित होते.