प्रतिनिधी /बेळगाव
राज्याचे कायदा मंत्री जे. सी. मधुस्वामी यांनी बेळगाव बार असोसिएशनला भेट दिली. यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. प्रभू यत्नट्टी यांनी त्यांचे स्वागत केले. विधानपरिषद सदस्य नारायण स्वामी, माजी विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके आदी उपस्थित होते.
यावेळी त्यांनी वकिलांच्या समस्या जाणून घेतल्या. न्यायालय व परिसरात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी आश्वासन दिले. या कार्यक्रमाला बेळगाव बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ऍड. सचिन शिवण्णावर, माजी अध्यक्ष ऍड. एस. एस. किवडसण्णावर यांच्यासह इतर वकील उपस्थित होते.