भाजपसह काँग्रेसने दिला पाठिंबा
प्रतिनिधी / बेळगाव
ग्राहक आयुक्त न्यायालय बेळगाव ऐवजी गुलबर्गा येथे हलविल्यामुळे वकिलांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. शुक्रवार पासून साखळी उपोषणालाही सुरुवात केली असून भाजप व काँग्रेस नेही वकिलांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. शुक्रवारी वकिलांनी साखळी उपोषणाला सुरुवात केली. न्यायालयातील कामकाज बंद केले आहे. एका न्यायालयाने मात्र काम सुरूच ठेवल्यामुळे काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रभू यत्नट्टी यांच्यासह इतर वकिलांनी उपोषण केले.या साखळी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बेळगाव उत्तर चे आमदार ॲडव्होकेट अनिल बेनके यांच्यासह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.